जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघानं टी20 विश्वचषकाच्या 34 व्या सामन्यात नामिबियाचा 41 धावांनी पराभव करून सुपर-8 च्या दिशेनं आगेकूच केली आहे. आता त्यांची नजर ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड सामन्यावर असेल. या सामन्यात कांगारूंनी स्कॉटलंडचा पराभव केला तर गतविजेता इंग्लंड सुपर-8 साठी पात्र ठरेल. अन्यथा त्यांना स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर पडावं लागेल.
नामिबियाविरुद्धच्या विजयानंतर इंग्लंडचे 4 सामन्यांत 5 गुण झाले आहेत. तर स्कॉटलंडचे 3 सामन्यांत इतकेच गुण आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड सामना पावसानं जरी वाहून गेला, तरी इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडेल हे विशेष.
इंग्लंड विरुद्ध नामिबिया सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात इंग्लिश संघानं प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी गमावून 122 धावा केल्या. स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकनं संघाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ब्रूकनं 20 चेंडूत 4 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकारांच्या मदतीनं 47 धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोनं 18 चेंडूत 31 धावा केल्या.
123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र त्यांच्या फलंदाजांना इंग्लंड इतकी आक्रमक फटकेबाजी करता आली नाही. नामिबियाला 10 षटकात 3 गडी गमावून केवळ 84 धावा करता आल्या. अशाप्रकारे जोस बटलरच्या संघानं 41 धावांनी विजय मिळवला.
या विजयासह इंग्लंडचा संघ ‘क’ गटात ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता त्यांच्या सर्व आशा ऑस्ट्रेलियावर टेकल्या आहेत. या गटातून ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच सुपर 8 साठी पात्र ठरला आहे. तर नामिबिया आणि ओमान बाहेर पडले आहेत. आता स्कॉटलँड आणि इंग्लंड यांच्यापैकी एक संघ पुढच्या फेरीत जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत विरुद्ध कॅनडा सामना पावसामुळे वाया गेल्यानं सुनिल गावसकर भडकले
भारतीय संघ गाठणार थेट अंतिम फेरी; जाणून घ्या समीकरण!
भारत विरुद्ध कॅनडा सामन्याला पावसानं लावली हजेरी, सामना रद्द