---Advertisement---

“इंग्लंडच्या संघात भारताला पराभूत करण्याची क्षमता आहे”, माजी खेळाडूने दिला सावधगिरीचा इशारा

On: शनिवार, फेब्रुवारी 6, 2021 12:48 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघात ४ कसोटी सामन्यांची मालिका आजपासून (५ फेब्रुवारी) पासून चेन्नई मध्ये सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच पूर्व भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोषी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, इंग्लंड संघ भारतीय संघाला मात देऊ शकतो.’

“इंग्लंड संघ भारतीय संघाला देऊ शकतो मात”

एका मुलाखतीत दिलीप दोषी यांनी भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले परंतु त्यांनी इंग्लंड संघ सुद्धा संतुलित दिसून येत आहे असे म्हंटले आहे. इंग्लंड संघ श्रीलंका मध्ये जाऊन श्रीलंका संघाला पराभूत करून आला आहे. आणि मुख्य बाब म्हणजे इंग्लंड संघात बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर सारखे खेळाडू आहेत. श्रीलंका दौऱ्यावर हे दोघे ही रोटेशन पॉलिसी मुळे संघाबाहेर होते.

पहिल्या दिवशी इंग्लंडने गाजवले वर्चस्व

भारत व इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्या इंग्लंड संघाने वर्चस्व गाजवले. कर्णधार जो रूटने नाबाद शतक झळकावले तर युवा सलामीवीर डॉम सिबलीने ८७ धावांची झुंजार खेळी केली. दिवसाखेर इंग्लंडची धावसंख्या ३ बाद २६३ इतकी झाली आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन तर आर अश्विनने एक बळी मिळविला.

महत्वाच्या बातम्या:

आयपीएल 2021 साठीच्या लिलावात सहभागी होणार अर्जुन तेंडुलकर, इतकी असेल बेस प्राईस

मेरा नाम है वॉशिंग्टन, रिषभ पंतने भर मैदानात रचले नवीन गाणे, पाहा भन्नाट व्हिडिओ

BAN vs WI : मेहदी हसनची अष्टपैलू कामगिरी, पहिल्या कसोटीवर बांग्लादेशची मजबूत पकड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---