रविवार (दि. 13 नोव्हेंबर) हा दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी खूपच खास आहे. या दिवशी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळत आहे. हा सामना इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. मात्र, या सामन्यात इंग्लंड संघातील खेळाडूंच्या दंडावर काळी पट्टी लक्षवेधी ठरली. प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न उपस्थित झाला की, इंग्लंडचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? चला तर दंडावर काळी पट्टी बांधण्यामागील कारण जाणून घेऊया…
‘हे’ आहे कारण
इंग्लंड संघाने दंडावर काळी पट्टी बांधून खेळण्याचा निर्णय घेतला. कारण, इंग्लंड संघाला ‘गॉड फादर ऑफ इंग्लिश क्रिकेट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेविड इंग्लिश (David English) यांना श्रद्धांजली वाहायची होती, त्यामुळे ते दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले. डेविड इंग्लिश हे एक लेखक, क्रिकेटपटू आणि अभिनेते होते. त्यांनी 15 वर्षांखालील स्पर्धा बनबरी फेस्टिव्हल (Bunbury Festival) सुरू करून इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये खूप मोठे योगदान दिले होते. या स्पर्धेमुळे किशोरवयीन खेळाडूंना एका मोठ्या व्यासपीठावर आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेने इंग्लंडला 1000 पेक्षा जास्त स्थानिक आणि 125 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिले. या स्पर्धेतून कारकीर्द घडवणारे काही खेळाडू टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत असलेल्या इंग्लंड संघात सामील आहेत.
सन 1987मध्ये झालेली बनबरी फेस्टिव्हलची सुरुवात
डेविड इंग्लिश यांचे अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी निधन झाले. त्यांंना हृदयविकाराच्या झटक्याने जीव गमवावा लागला. ते 76 वर्षांचे होते. सन 1987मध्ये डेविड यांनी ईसीबीच्या वार्षिक शालेय क्रिकेट स्पर्धांसाठी निधी देण्यास सांगितले होते. याबदल्यात या स्पर्धेचे नाव बदलून त्यांच्या मुलांची पत्रिका बनबरी टेल्सच्या नावावरून बनबरी फेस्टिव्हल असे नाव ठेवले होते. सन 2019मध्ये आयसीसी विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचे 10 खेळाडू आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बनबरी फेस्टिव्हलचा भाग राहिले होते.
एमसीसी स्टाफ म्हणून केले काम
डेविड इंग्लिश यांचा जन्म लंडन येथे सन 1946मध्ये झाला होता. त्यांचे पालनपोषण डेनडन येथे झाले. शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते मेरिलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसीमध्ये ग्राऊंड स्टाफ म्हणून काम करू लागले. पुढे जाऊन ते एमसीसीसाठी क्रिकेटही खेळले. ते पत्रकारदेखील होते. यानंतर त्यांनी डेक्का रेकॉर्ड्ससाठीही काम केले. त्यामध्ये ते प्रेस अधिकारी होते. त्यांच्या खांद्यावर रोलिंग स्टोन्स आणि टॉम जोन्स यांच्यासारख्या कलाकारांच्या प्रसिद्धीची जबाबदारी होती.
1⃣3⃣8⃣ runs to win the World Cup 🏏
Scorecard: https://t.co/WUiBm2gXQ4#T20WorldCup |#PAKvENG pic.twitter.com/5hmaI9alob
— England Cricket (@englandcricket) November 13, 2022
इंग्लंड-पाकिस्तान अंतिम सामना
इंग्लंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तान संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 137 धावा चोपल्या. आता हा विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडला 138 धावा कराव्या लागणार आहेत. (England Cricketers wear black arm band david english dies t20 world cup 2022 final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘काही लोकांचा चेहरा पुढच्या विश्वचषकात पाहायचा नाहीये’, विरेंद्र सेहवागची तिखट प्रतिक्रिया
मोठी बातमी! ग्लेन मॅक्सवेलसोबत घडली दुर्दैवी घटना, ‘इतके’ महिने राहणार क्रिकेटपासून दूर