अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने होते. विश्वचषक 2023 स्पर्धेतील या एकतर्फी महामुकाबल्यात भारताने सहजरीत्या 7 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, हा सामना काही वादांमुळे अजूनही चर्चेत आहे. पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर यांनी स्टेडिअममधील वातारण पाहून म्हटले होते की, हा सामना आयसीसी इव्हेंट वाटत नाहीये. ही एका द्विपक्षीय मालिकेसारखे होते. यामागील कारण म्हणजे, या सामन्यात ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणे वाजवले नव्हते. आता यावर इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानच्या पराभवामागे रोहित शर्मा याला जबाबदार ठरवले आहे. चला यामागील कारण जाणून घेऊयात…
रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांना फोडला घाम
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 191 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या. या सहजसोप्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 86 धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताने सहजरीत्या 7 विकेट्सने सामना खिशात घातला होता. या सामन्यानंतर रोहितवर कौतुकाचा वर्षावही झाला होता.
वॉनने उडवली खिल्ली
अशात भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर इंग्लंडच्या माजी खेळाडूने पाकिस्तानी संचालक मिकी आर्थर यांची खिल्ली उडवली आहे. विश्वचषकात समालोचन करताना मायकल वॉन (Michael Vaughan) याने हसत हसत म्हटले की, “या विश्वचषकात रोहित शर्माने डीजेला ‘दिल दिल पाकिस्तान’ गाणं वाजवण्यास न सांगणे, हे त्याने उचललेलं सर्वात चांगले पाऊल होते. त्याला माहिती होते की, डीजेने गाणे वाजवले असते, आणि पाकिस्तानने ते ऐकले असते, तर त्यांचा संघ विजयी झाला असता. तेव्हा हे चांगले पाऊल आहे. अशात निश्चितच रोहितने डीजेला प्रेरणादायी गाणे वाजवण्यास सांगितले नाही, जेणेकरून भारत जिंकू शकेल.”
Michael Vaughan said, "Rohit Sharma asked the Ahmedabad DJ to not play 'Dil Dil Pakistan', because he knew if Pakistan heard that song, they would win the game. So obviously Rohit told DJ to not play that inspirational song so India can win (smiles)". (Adam Gilchrist). pic.twitter.com/63UXtQBmM0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 21, 2023
पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव
खरं तर, पाकिस्तानी संघाचे संचालक मिकी आर्थर यांच्या या विचित्र वक्तव्यामुळे अनेक माजी खेळाडूही नाखुश आहेत. पाकिस्तान संघाची विश्वचषकातील कामगिरी पाहायची झाली, तर त्यांनी आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यात त्यांना 4 पैकी 2 सामन्यात विजय, तर 2 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील संघाने अखेरचा सामना शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. या सामन्यात त्यांना 62 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. (england former cricketer michael vaughan said pakistan team is losing because of rohit sharma)
हेही वाचा-
विश्वचषक 2023च्या सामन्यासाठी Wankhede Stadium सज्ज, तुम्हालाही आठवेल 2011चा ‘तो’ खास क्षण
पाकिस्तानच्या संचालकाची इच्छा पूर्ण, AUS vs PAK सामन्यात डीजे वाल्याने वाजवलं Dil Dil Pakistan गाणं- Video