भारतीय जनता पार्टीला 2024 च्या लोकसभा निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळवता आले नसले तरी. भाजपाने एनडीए आघाडी सोबत सलग तिसऱ्यांदा सरकार सत्ता स्थापन करण्याची हमी दिली आहे. नरेंद्र मोदी 9 जून रोजी सायंकाळी प्रधानमंत्री पदासाठी शपथ घेणार आहेत. यादरम्यान इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक विजया बद्दल आभिनंदन केले आहे. पीटरसनने सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म ‘X’ फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तो नरेंद्र मोदी सोबत हात मिळवताना दिसत आहे. आणि कॅप्शन शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने हिंदी मध्ये शुभेच्छा दिल्या.
केविन पीटरसन नरेंद्र मोदी को संदेश मध्ये लिहले होते “भारताचे नेतृत्व करण्यासाठी आणखी एक संधी मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन. प्रत्येक वेळी जेव्हा मी भारतात येतो तेव्हा देश अधिक चांगला विकसीत होत असतो. किती छान काम आहे सर! सर्व शुभेच्छा आणि खूप प्रेम.”
भारत का नेतृत्व करने के लिए एक और कार्यकाल हासिल करने के लिए @narendramodi को बहुत-बहुत बधाई। मैं जब भी भारत आता हूँ, देश बेहतर से बेहतर होता जाता है। क्या शानदार काम है, सर!
शुभकामनाएँ और ढेर सारा प्यार.
KP pic.twitter.com/Qk5UcAtP0J— Kevin Pietersen🦏 (@KP24) June 7, 2024
2023 मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’च्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त नरेंद्र मोदींनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात 20 किलोमीटरचा प्रवास केला होता. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते की, आता भारतात वाघांची संख्या 3,100 च्या वर गेली आहे. व्याघ्र प्रकल्पात फिरताना मोदी अनोखअया रुपात पहायला मिळाले होते. त्याच वेळी केविन पीटरसन मोदींच्या या अंदाजावर फिदा झाला होता. पीटरसम न्हणाला होती की मोदी असे नेते आहेत जे प्राणी मात्रांवर खूप प्रेम आहे. आणि त्यांच्या सोबत वेळ घालवायला त्यांना आवडते देखील. पीटरसनने असेही सांगितले की त्याच्या शेवटच्या वाढदिवशी त्याने जंगलातील अनेक चित्त्यांना मुक्त केले होते.
भाजपाला लोकसभा निवडणुकीत 240 जागा मिळाल्या आहेत. परंतू पुर्ण बहुमतासाठी 32 जागा भाजप दूर आहे. अशा स्थितीत एनडीए आघाडीतील जेडीयू आणि टीडीपीसह इतर छोट्या पक्षांसह भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. नरेंद्र मोदी 9 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्तवाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात पाहायला मिळाला आणखी एक लो स्कोअरिंग सामना! बांगलादेशचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय
श्रेयस अय्यरचा गौप्यस्फोट! टी20 विश्वचषकात स्थान न मिळल्यानंतर व्यक्त केली खंत, बीसीसीआयवर टीका
टी20 विश्वचषकात आणखी एक अपसेट! अफगाणिस्ताननं केला न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव