इंग्लंडमध्ये सुरू असलेली ‘द हंड्रेड’ क्रिकेट लीग स्पर्धा सध्या भरपूर चर्चेत आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काही ना काही प्रसंग घडत आहेत. ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. असाच आणखी एक प्रसंग गुरुवारी (५ ऑगस्ट) घडल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या स्पर्धेतील १९ वा सामना मँचेस्टर ओरिजिनल्स आणि साऊदर्न ब्रेव्ह यांच्यादरम्यान खेळला गेला. परंतु या रोमांचक सामन्यात पावसाने व्यत्यय निर्माण केल्यामुळे हा सामना ८५-८५ चेंडूंचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स याने चांगल्याच फॉर्ममध्ये असलेल्या जो क्लार्कला असा काही वेगवान चेंडू टाकला होता की, चेंडू यष्टीला धडकताच यष्ट्या पूर्णपणे हलून गेल्या होत्या.
In the absence of Jofra Archer, England may well look at Tymal Mills for the #T20WorldCup later this year. Has pace and quite a few variations up his sleeves. #TheHundred #TheHundredOnFanCode pic.twitter.com/nX4JMoUju5
— S Sudarshanan (@Sudarshanan7) August 6, 2021
मिल्सने टाकलेला हा चेंडू १३८ किमी प्रतितास पेक्षाही जास्त गतीचा होता. फलंदाज जो क्लार्कला या चेंडूवर नक्की कोणता शॉट खेळावा हे सुचेल इतक्यात चेंडू यष्टीला लागून तो त्रिफळाचीत झाला होता.
मिल्सने द हंड्रेड क्रिकेट लीग स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याची गोलंदाजी पाहून त्याला लवकरच इंग्लंड संघात पुनरागमन करण्याची संधी दिली जाऊ शकते. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याला जोफ्रा आर्चरऐवजी संघात स्थान दिले जून शकते. तसेच मिल्स आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळतो.(england pacer tymal mills clean bowled joe clarke in the hundred match )
या सामन्यात साऊदर्न ब्रेव्ह संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या सामन्यात पावसाचे आगमन झाल्यामुळे हा सामना ८५-८५ चेंडूंचा खेळवला गेला होता. परंतु हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. पहिल्या डावातील १४ षटक झाल्यानंतर हा सामना थांबवण्यात आला होता. तोपर्यंत मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने ३ बाद ९८ धावांपर्यंत मजल मारली होती.
महत्वाच्या बातम्या-
-ENG vs IND, 1st Test, 3rd Day: रॉबिन्सनच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद, भारताच्या ५ बाद १४५ धावा
-खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी
-अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे