इंग्लंड संघ पुढील महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि पाकिस्तान (England And Pakistan) यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने पाकिस्तान दौऱ्यासाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या कसोटी मालिकेत बेन स्टोक्स (Ben Stokes) पुनरागमन करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.
इंग्लंड कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. त्याच्या अनुपस्थितीत ऑली पोपने (Ollie Pope) इंग्लंडची धुरा सांभाळली होती. पोपच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने कसोटी मालिकेत 2-1ने वर्चस्व गाजवले होते आणि मालिका आपल्या खिशात घातली होती.
पाकिस्तानविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ– बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जोश हल, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, रेहान अहमद, गस एटकिन्सन, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्से, जॉर्डन कॉक्स
???? Happy with our squad? ????
???????? #PAKvENG ???????????????????????????? | #EnglandCricket pic.twitter.com/VBAryp083p
— England Cricket (@englandcricket) September 10, 2024
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील 3 कसोटी सामन्यांचे वेळापत्रक-
पहिला कसोटी सामना, (7 ते 11 ऑक्टोबर), मुल्तान क्रिकेट स्टेडियम
दुसरा कसोटी सामना, (15 ते 19 ऑक्टोबर), नॅशनल क्रिकेट स्टेडियम कराची
तिसरा कसोटी सामना, (24 ते 28 ऑक्टोबर), रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम
महत्त्वाच्या बातम्या-
लिंबू टिंबू गोलंदाजापुढेही बाबर आझम फ्लॉप! सराव सामन्यात केवळ 20 धावांवर बाद
वनडे-टी20 मध्ये कामगिरी उत्कृष्ट! तरीही ‘हा’ स्टार भारतीय कसोटी क्रिकेटपासून वंचित
टी20 विश्वचषक 2026 साठी आतापर्यंत कोणकोणते संघ पात्र ठरलेत? पाहा यादी






