नवी दिल्ली। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तान क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळण्यासाठी तयार आहे. परंतु यापूर्वी इंग्लंडला आयर्लंडविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेचे वेळापत्रकही समोर आले आहे.
मालिकेतील पहिला वनडे सामना ३० जुलैला खेळण्यात येणार आहे. त्याचबरोबर दुसरा वनडे सामना १ ऑगस्ट, तर तिसरा आणि शेवटचा सामना ४ ऑगस्टला खेळण्यात येणार आहे. हे सर्व सामने साऊथँम्पटन येथे खेळण्यात येणार आहे.
त्यानंतर इंग्लंड आणि पाकिस्तान संघात सामने होतील. या सामन्यांसाठी पाकिस्तानचा (Pakistan) २० सदस्यीय संघ २८ जूनला इंग्लंडला पोहोचला होता. यानंतर ६ आणखी सदस्य कोरोना निगेटिव्ह आढळल्यानंतर ३ जुलैला इंग्लंडला पोहोचले. पाकिस्तानचे आणखी ३ क्रिकेटपटू सोमवारी (६ जुलै) कोरोना निगेटिव्ह (Corona Negative) आढळल्यानंतर हे ३ खेळाडू ८ जुलै रोजी इंग्लंडला (England) पोहोचणार आहेत.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (Shoaib Malik) २४ जुलैपासून आपल्या संघाशी जोडला जाईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याला भारतातील आपल्या परिवाराशी भेटण्यासाठी काही दिवसांची मुभा दिली आहे.
इंग्लंड आणि आयर्लंड संघात होणाऱ्या वनडे मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
३० जुलै- पहिला वनडे सामना- द रोझ बाउल
१ ऑगस्ट- दुसरा वनडे सामना- द रोझ बाउल
४ ऑगस्ट- तिसरा वनडे सामना- द रोझ बाउल
इंग्लंड आणि पाकिस्तान संघात होणाऱ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
५ ते ९ ऑगस्ट- पहिला कसोटी सामना- ओल्ड ट्रॅफर्ड
१३ ते १७ ऑगस्ट- दुसरा कसोटी सामना- द रोझ बाउल
२१ ते २५ ऑगस्ट- तिसरा कसोटी सामना- द रोझ बाउल
२८ ऑगस्ट- पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना- ओल्ड ट्रॅफर्ड
३० ऑगस्ट- दुसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना- ओल्ड ट्रॅफर्ड
१ सप्टेंबर- तिसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना- ओल्ड ट्रॅफर्ड
ट्रेंडिंग घडामोडी-
-“येत्या १० वर्षात धोनी होणार सीएसकेचा बॉस”
-इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत हे ५ खेळाडू ठरु शकतात हिरो
-टीम इंडियावर लागलेला ‘घरके शेर’ धब्बा पुसणारा दादा