मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्याबद्दल मोठे वृत्त समोर आले आहे. इंग्लंड संघ पुढीलवर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टी२० मालिका होईल. याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.
इंग्लंड १२ ऑक्टोबरला पाकिस्तानला जाईल. त्यानंतर १४ आणि १५ ऑक्टोबरला दोन टी२० सामने कराची येथे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात होतील. ही मालिका झाल्यानंतर लगेचच दोन्ही संघ १६ ऑक्टोबरला टी२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात दाखल होतील.
पाकिस्तानने दिले होते दौऱ्याचे आमंत्रण
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की मागील महिन्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जानेवारी २०२१ मध्ये एका छोट्या दौरा करण्याचे आमंत्रण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला दिले होते. हे आमंत्रण इंग्लंडने मंगळवारी(१७ नोव्हेंबर) स्विकारले आहे, मात्र जानेवारीमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या मालिका असल्याने त्यांनी ऑक्टोबरमध्ये हा दौरा करण्याचा निर्णय घेतला. ज्याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मंजूरी दिली आहे.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 18, 2020
१६ वर्षांनंतर इंग्लंडचा पाकिस्तान दौरा
विशेष म्हणजे २००५ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका २०२१ च्या टी२० विश्वचषकाआधी होणार असल्याने त्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
इंग्लंडने पाकिस्तानमध्ये शेवटचे सन २००५ मध्ये ३ कसोटी सामने आणि ५ वनडे सामन्यांची मालिका खेळली होती. त्यानंतर २०१२ आणि २०१५ मध्ये या दोन संघात द्विपक्षीय मालिका झाल्या, पण त्या संयुक्त अरब अमिराती येथे झाल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीच्या व्हिडिओवर सुर्यकुमार यादवने केली कमेंट; चाहत्यांनी केला हल्लाबोल
‘या’ एका कारणामुळे भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया ठरणार वरचढ, माजी दिग्गजाची भविष्यवाणी
आयपीएलपुढे पाकिस्तान सुपर लीगमधील बक्षिसाची रक्कम म्हणजे… अतिसामान्य !!
ट्रेंडिंग लेख –
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला