---Advertisement---

पाचवी कसोटी: बर्थडे बॉय बटलरने सावरला इंग्लंडचा डाव; तर टीम इंडियाची अडखळत सुरुवात

On: शनिवार, सप्टेंबर 8, 2018 7:44 PM
---Advertisement---

लंडन। इंग्लंडने केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात सर्वबाद 332 धावा केल्या आहेत.

तसेच भारताची पहिल्या डावाची अडखळत सुरुवात झाली आहे. भारताचा आक्रमक सलामीवीर फलंदाज शिखर धवनने 3 धावांवर असताना डावाच्या दुसऱ्याच षटकात विकेट गमावली आहे. त्याला दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने पायचीत बाद केले.

तत्पुर्वी इंग्लंडने दुसऱ्या दिवशी(8 सप्टेंबर) 7 बाद 198 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी जॉस बटलर आणि आदिल रशीद नाबाद खेळत होते. या दोघांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर रशीद 15 धावा करुन बाद झाला.

यानंतर बटलरने ब्रॉडला साथीला घेत 9 व्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करत इंग्लंडला 300 धावांचा टप्पा पार करुन दिला. तसेच बटलरने अर्धशतकही केले. ही जोडी तोडण्यात नंतर फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाला यश आले. त्याने ब्रॉडला 38 धावांवर असताना केएल राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले.

यानंतर अखेर बटलरलाही बाद करण्यात जडेजाला यश मिळाले आणि इंग्लंडचा पहिला डाव संपुष्टात आला. त्याने बटलरचा हा झेल अजिंक्य रहाणेने घेतला. बटलरने या डावात 133 चेंडूत 89 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले.

त्याआधी पहिल्या दिवशी इंग्लंडकडून अॅलिस्टर कूक(71) आणि मोईन अलीने(50) अर्धशतके केली होती. तर जो रुट, जॉनी बेअरस्टो आणि सॅम करनला भोपळाही फोडता आला नव्हता. तसेच केटन जेनिंग्ज(23) आणि बेन स्टोक्सने(11) थोड्याफार धावा केल्या.

भारताकडून या डावात रविंद्र जडेजाने 79 धावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माने अनुक्रमे 83 आणि 62 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: अक्षर पटेलला विकेट घेण्यात चक्क हेल्मेटने केली मदत!

Video: मैदानावर ठेका धरणाऱ्या शिखर धवनने भज्जीलाही केले भांगडा करण्यास प्रोत्साहित

कूक आणि टीम इंडियाचे नाते खास…शेवटच्या सामन्यातही मोठा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment