इंंग्लंड संघ टी20 क्रिकेटमध्ये भलताच फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. आधी पाकिस्तानला टी20 मालिकेत धूळ चारल्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात इंग्लंडने 8 धावांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडने या विजयासह ऑस्ट्रेलियात खास कारनामा केला आहे. काय आहे तो कारनामा चला जाणून घेऊया…
पहिला टी20 सामना
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 208 धावा चोपल्या. इंग्लंडने दिलेल्या 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाला पार करता आले नाही. त्यांना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 200 धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने हा सामना 8 धावांनी खिशात घातला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. हा इंग्लंडचा ऑस्ट्रेलियामधील मागील सात सामन्यांमधील पहिला विजय आहे.
England go 1-0 up in a thriller 🙌🏻
Watch the #AUSvENG series LIVE on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺
Scorecard: https://t.co/c0glce4S2J pic.twitter.com/w1RwObm9Ij
— ICC (@ICC) October 9, 2022
ऑस्ट्रेलियातील मागील सात सामन्यांतील पहिला टी20 विजय
इंग्लंड संघ मागील 11 वर्षात जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला, तेव्हा त्यांना पराभवाचाच धक्का बसला. ऑस्ट्रेलियात यापूर्वी खेळलेल्या 6 टी20 सामन्यात इंग्लंड पराभूत झाला होता. मात्र, यावेळी त्यांनी कदाचित ‘जिंकूनच दाखवायचं’ अशा इराद्याने मैदानात पाऊल ठेवले होते. त्यांनी तब्बल 11 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 सामना जिंकून दाखवला.
इंग्लंडचा डाव
प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाकडून या सामन्यात ऍलेक्स हेल्स याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 51 चेंडूत 84 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 12 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार जोस बटलर याने 32 चेंडूत 68 धावा केल्या. त्यात 4 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना नेथन एलिस याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच, केन रिचर्ड्सन, डॅनियल सॅम्स आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
इंग्लंडचे ऑस्ट्रेलियातील शेवटचे 7 टी20 सामने
पराभूत
पराभूत
पराभूत
पराभूत
पराभूत
पराभूत
विजय*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नरची एन्ट्री, टेबल टॉपर फक्त ‘किंग कोहली’
‘अजून तर खूप खेळणार आहे…’, टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर शार्दुल ठाकुर नाराज