विश्वचषक 2023 स्पर्धेत इंग्लंड संघ शनिवारी (21 ऑक्टोबर) सपशेल अपयशी ठरताना दिसला. विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडचा हा चौथा सामना आहे. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध आधी त्यांच्या खर्च होणाऱ्या धावांवर लगाम घालता आली नाही. प्रत्युत्तरात संघ फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या चार फलंदाजांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या. अशात संघ चांगलाच अडचणीत आल्याचे दिसते.
इंग्लंडला या सामन्यात जिंकण्यासाठी 400 धावांचे भलेमोठे लक्ष्य मिळाले आहे. मात्र, सलामीवीर जॉनी बेअरस्टो याने अवघ्या 10 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर आलेला जो रुट 6 चेंडूत 2 धावा करून बाद झाला. तर संघाची तिसरी विकेट सलामीवीर डेविड मलान याच्या रुपात पडली. संघाची धावसंख्या 24 अशताना मलानने वैयक्तिक 6 धावांवर विकेट गमावली. इंग्लंडची ही वरची फळी अवघ्या 5.1 षटकांमध्ये उध्वस्त झाली. संघाला चौथा आणि मोठा झटका बसला तो बेन स्टोक्स याच्या रुपात. स्टोक्सने 8 चेंडूत 5 धावांचे योगदान दिल्यानंतर अष्टपैलू तंबूत परतला. (England’s top three are back in the pavilion for just 24 runs, while chasing 400)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), डेविड विली, आदिल रशीद, गस एटकिन्सन, मार्क वूड, रीस टोप्ली
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम (कर्णधार), हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी
महत्वाच्या बातम्या –
अखेर श्रीलंकेच्या पदरी पडला विजय! नेदरलँड्सला मात देत खोलले गुणांचे खाते
वानखेडेवर क्लासेन-जेन्सनचे वादळ! दक्षिण आफ्रिकेचे इंग्लंडसमोर 400 धावांचे आव्हान