इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. ९ एप्रिल पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी होणार आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा सुरु आहे. एकीकडे आयपीएल स्पर्धा सुरू आहे. तर दुसरीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशातच सर्वच स्तरातून आयपीएल स्पर्धेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटूने देखील आयपीएल बंद करण्याची मागणी केली आहे.
भारतात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आयपीएल स्पर्धा बंद करण्याची मागणी केली जात होती. आता इंग्लंडचा दिग्गज फुटबॉलपटू गॅरी लाइनकरने ट्विट करत लिहिले आहे की, “मला ही आयपीएल स्पर्धा तितकीच आवडते जितकी इतर कोणत्या क्रिकेट चाहत्याला आवडते. परंतु या क्षणी आयपीएलचे आयोजन खूप चुकीचे वाटत आहे. भारतात कोरोनाची प्रकरणे इतक्या वेगाने वाढत आहेत. आयपीएलमध्ये जितक्या वेगाने धावा केल्या जात आहेत, तितक्याच वेगाने लोकं आपले प्राण गमावत आहेत.”
https://twitter.com/GaryLineker/status/1386696747242639360
परदेशी मीडियाने देखील साधला होता निशाणा
गर्जियनच्या एका वृत्तपत्रात असे लिहिले होते की, “काही लोकांकडे पैसे आहेत ज्यांची टीका केली जाऊ शकत नाही. पण ते लोक आयपीएलमध्ये अधिक सुरक्षित आहेत. जय शाह बीसीसीआय चालवतात, ते बीसीसीआयचे सचिव आहेत आणि ते बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना अहवाल देत नसून गृहमंत्री अमित शहा यांना जास्त अहवाल देत आहेत.”
भारतात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. अंपायर नितीन मेनन आणि पॉल रिफेल यांनी देखील माघार घेतली होती. तसेच ऑस्ट्रेलियन सरकारने देशाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ऍडम झम्पा, केन रिचर्डसन या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आर अश्विनने देखील कोरोनामुळेच आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
आख्ख्या आयपीएल इतिहासातील अनोखा योगायोग! एक-दोन नाही, तर सलग ३ सामन्यात झाल्या सारख्याच धावा
राजस्थान संघात ‘हा’ खेळाडू घेणार बेन स्टोक्सची जागा; पाहा कशी आहे टी२० कारकिर्द






