इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये आपला बलाढ्य संघ मैदानात उतरवावा, कारण त्याचा आगामी टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषकात परिणाम होईल, असे इंग्लंडच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार इयोन मॉर्गनचे मत आहे.
कोविड -19 साथीच्या आजारामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कसोटीसाठी आणि मर्यादित षटकांसाठी वेगवेगळे संघ निवडले आहेत. म्हणजेच जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर आणि जोफ्रा आर्चर हे पाकिस्तान विरुद्ध 1-0 कसोटी मालिका जिंकणार्या संघाचे खेळाडू या टी-20 मालिकेचा भाग नाहीत.
तसेच, टी-20 मालिकेपूर्वीच इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉय दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. कोविड-19 चा प्रभाव पुढील वर्षापर्यंत कायम राहिल्यास इंग्लंड आगामी मालिकेत वेगवेगळे संघच खेळवू शकतात.
मॉर्गन म्हणाला, “सहसा बेंचवर बसणार्या खेळाडूंसाठी आगामी विश्वचषक स्पर्धांसाठी स्वत: ला सिद्ध करण्याची ही चांगली संधी आहे. आणि आता विश्वचषकातील सर्वात मोठ आव्हान म्हणजे आपला सर्वात मजबूत संघ बनविणे आणि आपली भूमिका निश्चित करणे. ”
तो म्हणाला, “जेव्हा आम्ही त्या भूमिका पार पाडू तेव्हाच आम्हाला आमच्या सर्वात मजबूत खेळाडूंना ओळखता येईल.”
इंग्लंड आणि पाकिस्तान संघातील पहिला टी-20 सामना शुक्रवारी पावसामुळे रद्द झाला. आता दुसरा सामना रविवारी होईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी होणार आहे.