फुटबॉल विश्वामध्ये मागील दीड वर्षापासून क्रिस्टियानो रोनाल्डोने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. युरोपमध्ये सध्या युरो कप 2020 सुरु आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातच पोर्तुगालच्या कर्णधाराने सर्वात जास्त युरो कप खेळण्याचा विक्रम तोडला आहे. परंतु रोनाल्डो हा विक्रम तोडायच्या अगोदर त्याने सॉफ्ट ड्रिंकमधील सर्वात मोठी कंपनी कोको कोलाला आपल्या एका छोट्याशा कृतीमुळे मोठा धक्का दिलेला आहे.
रोनाल्डोने त्यांच्यासोबत कोणताही करार तोडलेला नाही किंवा कंपनीला कोणताही धोका दिलेला नाही. परंतु रोनाल्डोने कोको कोलाच्या दोन बाटल्या स्वतःपासून दोन ते तीन फूट दूर केल्या होत्या. त्यामुळे हे वादळ निर्माण झाले आहे.
युरो कप 2020 मध्ये मंगळवारी, 15 जून रोजी हंगेरीविरुद्धच्या ग्रुप एफमधील पहिल्या सामनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच सोमवारी पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने बुडापेस्ट स्टेडियममध्ये पत्रकार परिषद भरवली. रोनाल्डो या पत्रकार परिषदेमध्ये आला. त्यानंतर तो खुर्चीवर बसला. सर्वात अगोदर त्याने समोर टेबलवर असलेले सॉफ्ट ड्रिंक कोको कोलाच्या दोन बॉटल बाजूला केल्या. आणि त्यानंतर आपल्यासोबत आणलेल्या पाण्याच्या बॉटल टेबलवर ठेवल्या.
रोनाल्डोच्या या वर्तनाने कोको कोलाचे मोठे नुकसान
यावेळी जगातील सर्वात तंदुरुस्त अॅथलीटपैकी एक रोनाल्डोने सांगितले की, तो अशा कोणत्याही सॉफ्ट ड्रिंकचे समर्थन करत नाही. कारण हे सॉफ्ट ड्रिंक आरोग्यासाठी चांगले नसतात.
साहजिकच ॲथलिट रोनाल्डोच्या या छोट्या कृत्यानंतर अनेकांनी कोका कोला हे सॉफ्ट ड्रिंक पिण्यापासून नकार दिला आणि त्याचा परिणाम कंपनीवर झाला आहे. डेली स्टारच्या अहवालानुसार, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास जेव्हा युरोपमध्ये शेअर बाजार सुरू झाला. तेव्हा कोका-कोलाच्या शेअरची किंमत 56.10 अमेरिकन डॉलर्स इतकी होती.
त्यानंतर अर्ध्या तासामध्ये रोनाल्डोचा व्हिडिओ व्हायरल होताच, कंपनीचे शेअर खाली घसरले. काही वेळात कोका-कोलाचा शेअर 55.22 डॉलरवर घसरला आणि कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.6 टक्क्यांनी खाली आली. अशाप्रकारे कोका-कोलाच्या किंमतीत जवळ जवळ 4 अब्ज डॉलर म्हणजेच 293.43 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.
👀 @Cristiano moving the sugary/unhealthy drinks and instead telling people to drink water… #Euro2020 pic.twitter.com/gcfssmmJ0r
— Sam Quek (@SamanthaQuek) June 14, 2021
दोन गोल करून संघाला विजय मिळवून दिला
कोका-कोला युरो 2020 चा अधिकृत प्रायोजक असून स्पर्धेतील सर्वात मोठ्या स्टारमुळेच त्यांना हे नुकसान सहन करावे लागले आहे. इतकेच नव्हे तर रोनाल्डोने केवळ कोका कोलालाच धक्का दिला नाही. तर मंगळवारी झालेल्या सामन्यात हंगेरीलाही जबरदस्त धक्का दिला. आपला पाचवा युरो कप खेळणार्या रोनाल्डोने सामन्याच्या 87 वे आणि 90 व्या मिनिटाला दोन गोल केले. आणि आपल्या संघाला 3-0 ने विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, ‘या’ महत्त्वाच्या दौऱ्यातून ७ खेळाडूंची माघार
‘पदार्पणाच्या कसोटीत धमाल करणार,’ धावांचा रतीब घालणाऱ्या सचिनला १७ वर्षीय खेळाडूची भुरळ
आजपासून होणार भारत-इंग्लंड महिला संघांची लढत, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही