क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेट मध्ये कोणत्याही क्षणी काही पण घडू शकते. याचीच प्रचिती काल (15 जुलै) पहायला मिळाले. युरोपियन क्रिकेट मध्ये ऑस्ट्रिया संघाने महान पराक्रम केले. संघाने टी10 क्रिकेट मधील शेवटच्या 2 षटकात चक्क 61 धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रियाने युरोपियन क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक धावांचा पाठलाग केला आहे.
युरोपियन क्रिकेमध्ये खेळले गेलेल्या ऑस्ट्रिया विरुद्ध रोमानिया सामन्यात हा जागतिक विक्रम झाला आहे. रोमानियाने प्रथम फलंदाजी करताना मार्यादित 10 षटकात 168 धावांचे तगडे अव्हान ऑस्ट्रिया संघासमोर ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रिया संघाचे निराशाजनक झाली. तर एकवेळी शेवटच्या 2 षटकात संघाला 61 धावांची गरज होती. मग ऑस्ट्रिया संघाच्या इक्बाल कडून तुफानी फलंदाजी पहायला मिळाली.
Austria chase 6️⃣1️⃣ runs in last 2 overs! 🤯#EuropeanCricket #EuropeanCricketInternational #StrongerTogether pic.twitter.com/Y8bLptmT56
— European Cricket (@EuropeanCricket) July 15, 2024
ऑस्ट्रियाने शेवटच्या 2 षटकात 61 धावा कुटल्या. अशक्य वाटणारा सामना 1 चेंडू राखून जिंकले. सामन्याच्या 9 व्या षटकात अखील इक्बालने चक्क 41 धावा ठोकल्या. तर 10 व्या शेवटच्या षटकात 20 धावा ठोकून ऑस्ट्रिया क्रिकेटने इतिहास रचला. ज्यामुळे आणखी एकदा स्पष्ट झाले आहे. क्रिकेट अशक्य अशी कोणतेही गोष्ट नाही तर याउलट क्रिकेटमध्ये सर्वकाही शक्य आहे.
महत्तवाच्या बातम्या-
युवराज-हरभजनच्या व्हिडिओने उडाली खळबळ, दिल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रोहित-विराटनंतर संघात त्यांची जागा कोण घेणार? भारताच्या माजी प्रशिक्षकानं दिली प्रतिक्रिया
ऑलिम्पिक सुरु होण्यापूर्वीच स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना ‘किंग’ कोहलीनं दिल्या शुभेच्छा…!