महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा श्रीगणेशा शनिवारपासून (दि. 4 मार्च) झाला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम मैदानावर गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात डब्ल्यूपीएल 2023 स्पर्धेचा पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यात गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई संघ फलंदाजीला येताच काय-काय घडलं, हे आपण या लेखातून जाणून घेऊयात. यासोबतच जगभरातील सर्वात मोठी लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामातही सर्वप्रथम काय-काय घडलेलं हेही पाहूयात…
गुजरात संघाचे नेतृत्व बेथ मूनी (Beth Mooney) हिच्याकडे आहे, तर मुंबई संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्याकडे आहे. या दोघींच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Giants vs Mumbai Indians) संघात पहिला-वहिला सामना खेळला गेला. या सामन्यात अनेक गोष्टी घडल्या.
काय-काय घडलं?
स्पर्धेतील पहिला चेंडू कुणी टाकला?
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेतील पहिला चेंडू गुजरात जायंट्स (Gujarat Giants) संघाची महिला खेळाडू ऍशले गार्डनर (Ashleigh Gardner) हिने टाकला. यावेळी गार्डनरपुढे स्ट्राईकवर यास्तिका भाटिया होती. विशेष म्हणजे, इंंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील पहिला चेंडू टाकण्याचा मान प्रवीण कुमार (Praveen Kumar) याला मिळाला होता.
स्पर्धेतील पहिली धाव कुणी घेतली?
डब्ल्यूपीएल (WPL) स्पर्धेतील पहिली धाव मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून सलामीला उतरलेल्या यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) हिने हिने घेतली. तिने गार्डनरच्या पहिल्या षटकातील चार चेंडू निर्धाव खेळले. मात्र, पाचव्या चेंडूवर फटका मारून एक धाव आपल्या खात्यात जोडली. आयपीएल (IPL) स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील पहिली धाव न्यूझीलंडचा माजी दिग्गज कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने घेतली होती. मॅक्युलम कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता.
First runs on the board by Yastika Bhatia!
Let's Go! 👊#OneFamily #MumbaIndians #WPL2023 #GGvMI
— Mumbai Indians (@mipaltan) March 4, 2023
स्पर्धेतील पहिली विकेट कुणी घेतली?
जगातील दुसरी सर्वात मोठी लीग असलेल्या महिला प्रीमिअर लीगमधील पहिली विकेट घेणारी गोलंदाज बनण्याचा मान तनुजा कंवर (Tanuja Kanwar) हिला मिळाला. तिने तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर यास्तिका भाटिया हिला 1 धावेवर जॉर्जिया वेरेहम (Georgia Wareham) हिच्याकडून झेलबाद केले. आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिल्या विकेटबाबत बोलायचं झालं, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या झहीर खान (Zaheer Khan) याने पहिली विकेट घेतली होती. त्याने सौरव गांगुली याला तंबूत धाडले होते.
The first wicket in the history of #TATAWPL! 😎
And it's Tanuja Kanwar with the breakthrough!#MI lose Yastika Bhatia's wicket in the second over.#GGvMI pic.twitter.com/31LGRTOdUj
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 4, 2023
𝑭𝒊𝒓𝒔𝒕-𝒆𝒗𝒆𝒓 wicket of #TATAWPL ☝️
Tanuja Kanwer with the breakthrough 🙌#GGvMI #BringItOn
— Gujarat Giants (@GujaratGiants) March 4, 2023
स्पर्धेतील पहिला चौकार कुणी मारला?
आता आपण स्पर्धेतील पहिला चौकार कुणी मारला हे पाहूयात. स्पर्धेतील गुजरातकडून दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या मानसी जोशी हिच्या गोलंदाजीवर हेली मॅथ्यूज हिने दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारला. आयपीएलच्या पहिल्या हंगामात हा कारनामा ब्रेंडन मॅक्युलम याने केला होता.
स्पर्धेतील पहिला षटकार कुणी मारला?
पहिला चेंडू, धाव, विकेट, चौकार तर आपण पाहिलाच, आता आपण स्पर्धेतील पहिला षटकार कुणी मारला हे पाहूयात. या स्पर्धेतील पहिला षटकार मारण्याचा मानही हेलीलाच मिळाला. तिने चौकार मारण्यापूर्वी मानसीच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार मारला.
𝐅𝐢𝐫𝐬𝐭-𝐞𝐯𝐞𝐫 𝐒𝐢𝐱 in WPL
Hayley Matthews, remember the name 🔥#OneFamily #MumbaIndians #WPL2023 #GGvMI
— Mumbai Indians (@mipaltan) March 4, 2023
दुसरीकडे, आयपीएलमधील पहिल्या षटकाराबाबत बोलायचं झालं, तर हा मान ब्रेंडन मॅक्युलम याला मिळाला होता. (everything first in wpl 2023 who did it first know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL 2023: उद्घाटनाच्या सामन्यात नाण्याचे नशीब गुजरातच्या बाजूने, मुंबईची प्रथम फलंदाजी
ब्रेकिंग! WPL हंगामाला सुरुवात होण्याआधीच वादाची ठिणगी! अदानींच्या संघातून दिग्गज बाहेर, कारण संताप आणणारे