---Advertisement---

आता रंगणार सुपर १२ फेरीचा थरार! कधी, कुठे होणार सर्व सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

---Advertisement---

दुबई। संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे सध्या टी२० विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकातील पहिली फेरी शुक्रवारी (२२ ऑक्टोबर) संपली. याबरोबरच आता टी२० विश्वचषकातील पुढील फेरीसाठी म्हणजेच सुपर १२ फेरीसाठी अंतिम १२ संघ मिळाले आहेत. त्यामुळे शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) सुपर १२ फेरीला सुरुवात होईल.

पहिल्या फेरीतून श्रीलंका, बांगलादेश, स्कॉटलंड आणि नामिबिया या संघांनी सुपर १२ साठी पात्रता मिळवली आहे. तर, टी२० क्रमवारीत अव्वल ८ स्थानांवर असलेले संघ यापूर्वीच सुपर १२ साठी थेट पात्र ठरले होते. या ८ संघांमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या गटवारीनुसार आता सुपर १२ फेरीसाठी गतविजेते वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबरच श्रीलंका आणि बांगलादेशचा पहिल्या गटात समावेश आहे. श्रीलंकेने पहिल्या फेरीत अ गटात अव्वल क्रमांकावर राहात, तर बांगलादेशने ब गटात दुसरा क्रमांक मिळवत सुपर १२ साठी पात्रता मिळवली आहे.

याशिवाय सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान या संघांसह स्कॉटलंड आणि नामिबिया या संघांचा समावेश आहे. स्कॉटलंडने पहिल्या फेरीतील ब गटात अव्वल क्रमांक मिळवत, तर नामिबियाने अ गटात दुसरा क्रमांक पटकावत सुपर १२ साठी पात्रता मिळवली आहे.

सुपर १२ च्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम सामन्यात विजेतेपदासाठी एकमेकांसमोर येतील.

सुपर १२ फेरीला २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याने सुरुवात होईल. याचदिवशी इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघ देखील आमने-सामने येतील. तर, २४ ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ दुबई येथे आमने-सामने येतील.

बाद फेरीचे सामने १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान पार पडतील. १० आणि ११ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होतील, तर १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होईल.

सुपर १२ फेरीसाठी असे दिले जातील गुण 
सुपर १२ फेरीत सामन्यात विजयी होणाऱ्या संघाला २ गुण दिले जातील. तसेच जर, सामना बरोबरीत सुटला किंवा सामन्याचा निकाल लागला नाही किंवा सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल. तसेच पराभूत होणाऱ्या संघास शून्य गुण मिळतील. या गुणांच्या आधारे गुणतालिकेत संघांचे स्थान ठरेल.

सुपर १२ फेरीसाठी गटवारी 
पहिला गट – वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश
दुसरा गट – भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया

सुपर १२ फेरीचे वेळापत्रक – 
२३ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अबुधाबी (दुपारी- ३.३० वाजता)
२३ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
२४ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, शारजाह (दुपारी- ३.३० वाजता)
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
२५ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह (संध्या- ७.३० वाजता)
२६ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई (दुपारी- ३.३० वाजता)
२६ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह (संध्या- ७.३० वाजता)
२७ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, अबुधाबी (दुपारी- ३.३० वाजता)
२७ ऑक्टोबर – स्कॉटलंड विरुद्ध नामिबिया, अबूधाबी (संध्या- ७.३० वाजता)
२८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
२९ ऑक्टोबर – वेस्ट इंडीज विरुद्ध बांगलादेश, शारजाह (दुपारी- ३.३० वाजता)
२९ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, शारजाह (दुपारी- ३.३० वाजता)
३० ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
३१ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध नामिबिया, अबुधाबी (दुपारी- ३.३० वाजता)
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
१ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह (संध्या- ७.३० वाजता)
२ नोव्हेंबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, अबुधाबी (दुपारी- ३.३० वाजता)
२ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध नामिबिया, अबुधाबी (संध्या- ७.३० वाजता)
३ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड, दुबई (दुपारी- ३.३० वाजता)
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी (संध्या- ७.३० वाजता)
४ नोव्हेंबर –  ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, दुबई (दुपारी- ३.३० वाजता)
४ नोव्हेंबर – वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका, अबुधाबी (संध्या- ७.३० वाजता)
५ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध नामिबिया, शारजाह (दुपारी- ३.३० वाजता)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध स्कॉटलंड, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
६ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज, अबुधाबी (दुपारी- ३.३० वाजता)
६ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह (संध्या- ७.३० वाजता)
७ नोव्हेंबर – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी (दुपारी- ३.३० वाजता)
७ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह (संध्या- ७.३० वाजता)
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध नामिबिया, दुबई (संध्या- ७.३० वाजता)

बाद फेरी – 
१० नोव्हेंबर –  उपांत्य सामना – १, अबुधाबी (संध्या- ७.३० वाजता)
११ नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई (संध्या- ७.३० वाजता)
१४ नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई (संध्या- ७.३० वाजता)

महत्त्वाच्या बातम्या – 

‘हे’ दोन संघ टी२० विश्वविजेता बनण्याचे सर्वात मोठे दावेदार, शेन वॉर्नने वर्तवले भाकीत

नामिबियाचा आयर्लंडला पराभवाचा धक्का; ८ विकेट्सने विजय मिळवत सुपर १२ मध्ये दणक्यात प्रवेश

उत्सुकता भारत-पाकिस्तान सामन्याची! तिकीटं ३३३ पट महाग, तर हॉटेलही झाले फुल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---