एकदिवसीय विश्वचषक 2023 संपला आहे. भारतीय क्रिकेट संघाने या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आणि सर्व 10 सामने जिंकून अंतिम फेरी गाठली, मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव करत विश्वचषक जिंकला. या विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. हे दोन्ही फलंदाज संपूर्ण विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे टॉप 2 फलंदाज होते.
अशा परिस्थितीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 विश्वचषकात खेळायचे की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्नाचे उत्तर देताना, जगातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम करणारा पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने एका कार्यक्रमात सांगितले की, “तुमच्याकडे रोहित शर्मापेक्षा मोठा सलामीवीर फलंदाज आहे का? सध्या संपूर्ण जगात रोहित शर्मापेक्षा मोठा सलामीवीर फलंदाज कोणी आहे का? तर नाही. रोहित शर्मा हा जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाज आहे, जेव्हा तो एकदिवसीय विश्वचषकात 125 च्या वरच्या स्ट्राईक रेटने धावा करू शकतो, तेव्हा तो टी20 मध्ये कसा खेळेल याची कल्पना करा, मग तुम्ही त्याला टी20 वर्ल्ड कपमध्ये कसे खेळवणार नाही.”
या कार्यक्रमात शोएब अख्तरला विचारण्यात आले की, हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला टी20 कर्णधार बनवल्यास रोहित आणि विराट त्याच्या नेतृत्वाखाली खेळतील का? या प्रश्नाच्या उत्तरात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, “बघा, धोनी कर्णधार झाला, सचिन त्याच्या नेतृत्वाखाली खेळला, आणि त्याने सचिनचा आदर केला, मग धोनी विराटच्या नेतृत्वाखाली खेळला, विराटने धोनीचा आदर केला, आता विराट रोहितच्या नेतृत्वाखाली खेळला, आणि रोहितने विराटचा आदर केला. त्यामुळे हार्दिक पांड्या जरी कर्णधार झाला तरी आता त्याच्यावर रोहित आणि विराट या ज्येष्ठ खेळाडूंचा असाच आदर करण्याची वेळ आली आहे, कारण या दोन ज्येष्ठ खेळाडूंमुळेच हार्दिक आज जिथे आहे तिथे पोहोचला आहे.” (Ex-Pakistan bowler’s eye-catching reaction to Rohit Sharma Said He is the most)
म्हत्वाच्या बातम्या
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पूर्ण, भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केली भावनिक पोस्ट
ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा मोठा खुलासा; म्हणाला, ‘भारतीय फलंदाजांपेक्षा…’