फुटबॉलविश्वात शनिवारी (दि. 03 जून) मोठी घडामोड घडली. वेम्बली स्टेडिअममध्ये एफए चषकाचा अंतिम सामना मॅनचेस्टर सिटी विरुद्ध मॅनचेस्टर युनायटेड संंघात पार पडला. हा सामना मॅनचेस्टर सिटीने आपल्या खिशात घातला. 151 वर्षे जुन्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिटीने आपला प्रतिस्पर्धी युनायटेडला 2-1ने पराभूत केले. यासह सिटीने एफए कप सातव्यांदा आपल्या नावावर केला. त्यांनी यापूर्वीचे विजेतेपद 2019मध्ये पटकावले होते.
लंडनच्या वेम्बली स्टेडिअमध्ये लाखो चाहते या रोमांचक अंतिम सामन्याचे साक्षीदार बनले. हा सामना पाहण्यासाठी भारतीय दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली, त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, सलामीवीर शुबमन गिल आणि विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव हेदेखील पोहोचले होते. विराट-अनुष्का यांना मॅनचेस्टर सिटी (Manchester City) आणि प्यूमा ब्रँडने सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांचे यादरम्यानचे फोटोही व्हायरल होत आहेत.
Virat Kohli, Anushka Sharma and Shubman Gill at the FA Cup Final.
King Kohli with the Manchester City jersey! pic.twitter.com/vYwag44pxq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 3, 2023
गुंडोगनने मारला एफए कप स्पर्धेचा पहिला वेगवान गोल
मॅनचेस्टर सिटीचा मिडफील्डर इलकाए गुंडोगन (İlkay Gündoğan) याने एफए कप (FA Cup) इतिहासातील सर्वात वेगवान गोल मारला. सामना सुरू होताच गोलकीपर याच्याकडे चेंडू गेला आणि त्याने पुढच्या दिशेने शॉट मारला. यावेळी गुंडोगनने बॉक्सच्या बाहेरून शानदार वॉली मारत गोल केला. अशाप्रकारे सामन्याच्या सुरुवातीलाच मॅनचेस्टर सिटीने युनायटेडवर आघाडी घेतली.
🏆 1904
🏆 1934
🏆 1956
🏆 1969
🏆 2011
🏆 2019
🏆 2023 pic.twitter.com/gddZbF3pOI— Manchester City (@ManCityES) June 3, 2023
सामन्याचा दुसला गोलही गुंडोगन यानेच केला. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये 51व्या मिनिटाला गुंडोगनने बॉक्सच्या बाहेरून शॉट मारला, जो थेट मॅनचेस्टर युनायटेड (Manchester United) संघाच्या नेटमध्ये गेला. गोलकीपर डेविड डे हेया शॉट रोखण्यात अपयशी ठरला.
पेनल्टीहून आला मॅनचेस्टर युनायटेडचा एकमेव गोल
मॅनचेस्टर युनायटेड संघाचा एकमेव गोल हा 33व्या मिनिटाला पेनल्टीहून आला. 32व्या मिनिटात मॅनचेस्टर सिटीच्या खेळाडूने आपल्याच बॉक्समध्ये हँड फाऊल केला. त्यामुळे युनायटेडला पेनल्टी मिळाली. यावेळी ब्रूनो फर्नांडिसने कोणतीही चूक न करता गोल केला.
मात्र, 51व्या मिनिटाला बॉक्सच्या बाहेरून गुंडोगनच्या वॉलीने सिटीला पुन्हा एकदा आघाडीवर पोहोचवले. युनायटेडच्या 40 टक्के पजेशन आणि टार्गेटवर फक्त एक शॉटच्या तुलनेत सिटीने 60 टक्के पजेशन आणि टार्गेटवर पाच शॉटसह खेळाच्या मोठ्या भागावर आपला दबदबा निर्माण केला.
एफए कपचे सातवे विजेतेपद
सिटीने आपला सातवा एफए कपचे विजेतेपद जिंकले. त्यांनी शेवटचा किताब 2019मध्ये जिंकला होता. त्यावेळी त्यांनी वाटफोर्डला 6 गोलने पराभूत केले होते. आर्सेनल हा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक एफए कप किताब (14) जिंकणारा क्लब आहे. तसेच, मॅनचेस्टर युनायटेड 12 किताबांसह दुसऱ्या स्थानी आहे. (fa cup final manchester city defeated manchester united wins title after 4 years read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ क्लबकडून खेळताना दिसणार मेस्सी? कराराचा आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
भयानक! प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या स्टेडियममध्ये चालू सामन्यात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू