आपण अनेकवेळा खेळाडूंच्या दुखापतग्रस्त होऊन कोणत्या तरी स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या घटनांबद्दल ऐकले असेल. परंतु वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूला आपली फ्लाईट सोडल्यामुळे कॅरेबियन प्रीमियर लीग २०२० मधून बाहेर व्हावे लागले आहे. हे ऐकूण नक्कीच आश्चर्य वाटेल. खरं तर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू फेबियन ऍलनने जमैकावरून बार्बाडोजची फ्लाईट सोडल्यामुळे तो सीपीएलमधून बाहेर पडला आहे.
विमानतळावर पोहोचला होता उशिरा
वेस्ट इंडिजचा खेळाडू ऍलन खरं तर विमानतळावर उशिरा पोहोचला होता. त्यामुळे त्याला आपली फ्लाईट सोडावी लागली. आणि तो आता स्पर्धेतूनही बाहेर झाला आहे. सीपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना १८ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या सीपीएलच्या १४ दिवसांपूर्वी त्रिनिदाद येथे पोहोचायचे होते. आणि सर्व खेळाडूंसाठी काही चार्टेड विमानांची व्यवस्था केली होती. परंतु ऍलनची फ्लाईटला मुकली आहे.
ऍलनला सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स संघाने या मोसमासाठी रिटेन केले होते. परंतु त्याच्या एका चुकीमुळे संघाला मोठा फटका बसला आहे. ऍलनच्या मॅनेजरने सांगितले, “फ्लाईटच्या माहितीबाबत थोडा गैरसमज झाला होता. त्यामुळे ऍलन वेळेवर विमानतळावर पोहोचू शकला नाही. आणि त्याची चार्टेड फ्लाईट मिस झाली.”
सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स संघाला बसला मोठा फटका
कोरोना व्हायरसमुळे त्रिनिदाद जाण्यासाठी केवळ एकच मार्ग होता. ऍलनच्या सीपीएल स्पर्धेतून बाहेर होण्यामुळे सेंट किट्स संघाला चांगलाच फटका बसला आहे. ऍलनने संघासाठी गोलंदाजी आणि फलंदाजीत चांगली कामगिरी केली होती. त्याने १८१.१८ च्या स्ट्राईक रेटने ३३७ धावा केल्या होत्या तसेच तो उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही आहे.
सेंट किट्सचे प्रशिक्षक सायमन हेलमॉटही सीपीएल २०२० मधून बाहेर झाले आहेत. हेलमॉट हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि त्यामुळे त्यांनी सीपीएलमधून आपले नाव परत घेतले आहे. त्रिनिदादचा खेळाडू डेनिस बुलीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे आणि त्याची जागा इम्रान खानने घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रॅसी वॅन दर दुसेनही सीपीएल स्पर्धेसाठी त्रिनिदाद पोहोचला नाही.
सीपीएलमध्ये सामील होणारे १६२ व्यक्ती कोरोना निगेटिव्ह
सीपीएलमध्ये भाग घेण्यासाठी त्रिनिदादचा प्रवास करणारे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, सामना अधिकारी आणि प्रशासकांचा १६२ सदस्यांचा दल कोविड- १९ निगेटिव्ह आढळला आहे. सीपीएल माध्यमांनुसार, लीगच्या सुरक्षेसाठी कठोर प्रोटोकॉल अंतर्गत ३ खेळाडू आणि एक प्रशिक्षकाला प्रवास करता आलेला नाही.
सीपीएल स्पर्धा १८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे आणि त्रिनिदादमध्ये २ ठिकाणांवर ३३ सामने खेळले जातील. पहिल्या सामन्यात मागील वर्षीचा उपविजेता गयाना ऍमेझॉन वॉरिअर्सचा सामना आणि त्रिबंगो नाईट रायडर्सशी होणार आहे, तर अंतिम सामना १० सप्टेंबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर सर्व खेळाडू आयपीएलसाठी यूएईला रवाना होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-बापरे! आयसीसीच्या फेसबुक पेजने रचला इतिहास, व्हिडिओ चॅनेलला तब्बल १.६५ अब्ज वेळा पाहण्यात आले
ट्रेंडिंग लेख-
-वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा
-एकाच वनडेत ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ४ भारतीय क्रिकेटर
-हे ५ दिग्गज कदाचित कधीच नाही खेळू शकणार आयपीएल