दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या टी20 विश्वचषकात सहभागी झाला आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) याने आपले आत्मचरित्र प्रसिद्ध केलेय. या आत्मचरित्रात त्याने अनेक धक्कादायक खुलासे करत, दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये वादळ निर्माण केले. त्याने केलेल्या खुलाशांमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट वर्तुळात मोठे वादंग येऊ शकते.
फाफ डू प्लेसिसने नुकतेच आपले आत्मचरित्र ‘फाफ थ्रू फायर’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले. यामध्ये त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीदरम्यानच्या अनेक घटनांचा उलगडा केला. आपल्याला कारकिर्दीच्या शेवटी म्हणावा तसा पाठिंबा मिळाला नसल्याचा आरोप त्याने केला. त्याने लिहिले,
“क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी संवाद साधने म्हणजे त्या व्यक्तीशी संवाद साधने ज्यांना आपली किंमत नाही. मी त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश आले.”
आपल्या अवेळी घेतलेल्या निवृत्तीसाठी त्याने थेट संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचर व दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांना जबाबदार धरले. तो म्हणाला,
“मला 2021 व 2022 टी20 विश्वचषकात खेळायची इच्छा होती. मात्र, बाऊचर व स्मिथ मला धमकावत राहिले. त्यामुळेच मी निवृत्ती जाहीर केली.”
फाफ डू प्लेसिस हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. आपल्या कारकिर्दी दरम्यान 69 कसोटी, 143 वनडे व 50 टी20 सामने दक्षिण आफ्रिकेसाठी खेळले. यादरम्यान त्याने 11000 पेक्षा जास्त धावा केल्या. संघात समावेश केला जात नसल्याने त्याने मागील वर्षी अचानक निवृत्ती जाहीर केली होती. सध्या तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापेक्षा टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढली, मोडीत निघाले सर्व विक्रम
अस कस घडल! विराट पाकची पिसे काढत असताना बिघडली भारताची अर्थव्यवस्था; वाचा संपूर्ण प्रकरण