---Advertisement---

चेन्नईकडून एकाकी झुंज देणाऱ्या फाफ डु प्लेसिसचा ‘मोठा’ विक्रम राहिला दुर्लक्षितच!

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 3:45 PM
---Advertisement---

दुबई। शुक्रवारी(२५ सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल २०२० मधील ७ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईला ४४ धावांनी मात देत सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात विजयासाठी दिल्लीने चेन्नईला १७६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला ७ बाद १३१ धावाच करता आल्या.

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने ३५ चेंडूत ४३ धावांची खेळी करत थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. असे असले तरी त्याने या सामन्यात एक खास विक्रम केला आहे. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २००० धावांचा टप्पा पार केला आहे.

त्याचे आयपीएलमध्ये आता ७४ सामन्यात ३३.२१ च्या सरासरीने २०२६ धावा झाल्या आहेत. तो आयपीएलमध्ये २००० धावांचा टप्पा पार करणारा एकूण ३३ वा खेळाडू ठरला आहे तर १३ वा परदेशी खेळाडू ठरला आहे.

चेन्नईकडूनही झाल्या २००० धावा पूर्ण – 

एवढेच नाही तर फाफ डुप्लेसिसने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतानाही २००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने चेन्नईकडून खेळताना ३३.१६ च्या सरासरीने २०२३ धावा केल्या आहेत. तो चेन्नईकडून २००० धावांचा टप्पा पार करणारा केवळ पाचवाच क्रिकेटपटू ठरला आहे. तर माईक हसी (२२१३) नंतरचा दुसराच परदेशी क्रिकेटपटू ठरला आहे. चेन्नईकडून फाफ डु प्लेसिस, माईक हसी व्यतिरिक्त सुरेश रैना(५३६९), एमएस धोनी(४३५१) आणि मुरली विजयने(२२०५) २००० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---