---Advertisement---

अविश्वसनीय! सुपर किंग्जच्या खेळाडूने घेतला सुपरमॅन स्टाईलमध्ये अशक्य झेल, VIDEO

On: गुरूवार, फेब्रुवारी 6, 2025 10:00 AM
---Advertisement---

फाफ डू प्लेसिस सध्या दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या 2025 च्या SA20 लीगमध्ये खेळताना दिसत आहे. तो या स्पर्धेत जोबर्ग सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. लीगमध्ये सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात, फाफ डु प्लेसिसने असा अशक्यप्राय झेल घेतला की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. वयाच्या 40 व्या वर्षी असा झेल घेणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नसते.

डू प्लेसिसच्या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, इम्रान ताहिर सनरायझर्स ईस्टर्न केपच्या बेडिंगहॅमला गोलंदाजी करत आहे. जो तो चेंडू हवेत कव्हरकडे मारतो. चेंडू त्याच्या दिशेने येत असल्याचे पाहून, डु प्लेसिसने एक शानदार डायव्ह घेतला आणि तो पकडला. पहिल्या डावातील 5 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हा कॅच घेण्यात आला. पाहा व्हिडिओ..

एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स ईस्टर्न केपने 32 धावांनी विजय मिळवला. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील जोबर्ग सुपर किंग्जला पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स ईस्टर्न केपने 20 षटकांत 6 बाद 184 धावा केल्या. यादरम्यान, कर्णधार एडेन मार्करामने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने 40 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या.

त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करताना, जोबर्ग सुपर किंग्ज 20 षटकांत फक्त 152/7 धावाच करू शकले. संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोने सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने 17 चेंडूत 3 चौकार आणि 3 षटकारांसह 37 धावा केल्या. यादरम्यान, सनरायझर्स ईस्टर्न केपकडून क्रेग ओव्हरटन, लियाम डॉसन आणि ओथनिएल बार्टमन यांनी 2-2 विकेट घेतल्या.

हेही वाचा-

नागपूरमध्ये विराट-रोहितची बॅट आग ओकते, दोघांनी मिळून केल्या आहेत ‘इतक्या’ धावा
IND vs ENG: ‘मी येथे स्पष्टीकरण…..’, निवृत्तीच्या प्रश्नावर हिटमॅनच्या तळपायाची आग मस्तकात
IND vs ENG; पहिल्या वनडे सामन्यात पाऊस खोळंबा घालणार का? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---