कोरोनामुळे स्थगित केला गेलेला पाकिस्तान सुपर लीगचा (पीएसएल) सहावा हंगाम पुन्हा एकदा अबुधाबी येथे सुरू झालेला आहे. अबूधाबी स्थित शेख झायेद इंटरनॅशनल स्टेडियमवर ढाका ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात ढाका ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधित्व करणारा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू फाफ डू प्लेसिस हा गंभीररित्या दुखापतग्रस्त झाला. पुढील उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे वृत्त समोर येत आहे.
संघसहकार्याशी झाली धडक
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार असलेला फाफ डू प्लेसिस पीएसएलमध्ये ढाका ग्लॅडिएटर्स या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पेशावर झाल्मी विरुद्धच्या सामन्यात पेशावर संघ फलंदाजी करत असताना प्लेसिस सातव्या षटकात क्षेत्ररक्षण करत असताना दुखापतग्रस्त झाला.
पेशावरच्या फलंदाजाने चौकाराच्या दिशेने मारलेला चेंडू अडविण्यासाठी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेला प्लेसिस धावला व त्याने सूर मारत तो चेंडू अडवला. मात्र, तो तसाच पुढे पसरत गेल्याने लॉंग ऑफवरून धावत आलेल्या मोहम्मद हसनेन याच्या गुडघ्यावर त्याचे डोके आदळले. या घटनेनंतर सामना काही काळ थांबवण्यात आला. प्लेसिस याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
Faf du Plessis has been taken to the hospital for tests. He collided with M Hasnain during tonight’s PSL game. Get well soon, Faf ..
Two matches two major injuries first Andre Russell And now faf#FafduPlessis #QGvPZ #pzvsqg pic.twitter.com/jCjrkUjdqy— Teto Patiyaa 🇵🇰 (@Pola_620) June 12, 2021
रसेलला देखील झाली दुखापत
शुक्रवारी (११ जून) पीएसएलमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड संघात सामना झाला. या सामन्यात क्वेटाकडून खेळणारा आंद्रे रसल इस्लामाबादच्या मुसा खान विरुद्ध फलंदाजी करताना हेल्मेटवर चेंडू आदळल्याने जखमी झाला. डाव संपल्यानंतर रसेलला कन्कशनचा त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल केले गेले. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून नसीम शहा याला संधी देण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
वामिका विराटसारखी दिसते की अनुष्कासारखी? विराटच्या बहिणीने दिले ‘असे’ उत्तर
विरेंद्र सेहवाग म्हणतो, रोहित शर्मा आणि न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजामधील स्पर्धा पाहण्यास उत्सुक