दुबई। एमएस धोनी कर्णधार असलल्या चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा धक्का दिला. चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी सामना जिंकत चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. यासह आयपीएलच्या २०२१ हंगामाची सांगता झाली. हा सामना झाल्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. दरम्यान, यंदा ‘फेअर प्ले’ पुरस्कार संजू सॅमसनने नेतृत्त्व केलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला मिळाला आहे.
फेअर प्ले अवॉर्ड आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून दिला जातो. हा पुरस्कर त्या संघाला दिला जातो, ज्या संघाने संपूर्ण स्पर्धा खिलाडूवृत्तीने खेळली आहे. प्रत्येक संघाला त्यांच्या सामन्यानंतर प्लेअर प्लेचे म्हणजेच खिलाडूवृत्तीचे गुण दिले जातात. स्पर्धेच्या शेवटी ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात त्या संघाला हा पुरस्कार मिळतो.
यंदाच्या हंगामात हा पुरस्कार राजस्थान रॉयल्सने जिंकला आहे. तसेच या पुरस्काराचा इतिहास पाहाता सर्वाधिकवेळा हा पुरस्कार एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकला आहे. त्यांना ६ वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. या लेखात आपण आत्तापर्यंत ज्या संघांना फ्लेअर प्ले पुरस्कार मिळाला आहे, त्यांचा आढावा घेऊ.
फेअर प्ले अवॉर्ड जिंकणारे संघ –
२००८ – चेन्नई सुपर किंग्स
२००९ – किंग्स इलेव्हन पंजाब
२०१० – चेन्नई सुपर किंग्स
२०११ – चेन्नई सुपर किंग्स
२०१२ – राजस्थान रॉयल्स
२०१३ – चेन्नई सुपर किंग्स
२०१४ – चेन्नई सुपर किंग्स
२०१५ – चेन्नई सुपर किंग्स
२०१६ – सनरायझर्स हैदराबाद
२०१७ – गुजरात लायन्स
२०१८ – मुंबई इंडियन्स
२०१९ – सनरायझर्स हैदराबाद
२०२० – मुंबई इंडियन्स
२०२१ – राजस्थान रॉयल्स
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ मधील पुरस्कारांवर ऋतुराज-हर्षलचे वर्चस्व, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
भन्नाटच! जडेजाने घेतले अय्यर अन् नरेनचे अफलातून झेल; पाहून तुम्हीही कराल प्रशंसा