अहमदाबाद । इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील रोमांचक अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) थाटात पार पडला. हा सामना नवख्या गुजरात टायटन्स आणि पहिल्या आयपीएल हंगामाचा विजेता राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. हा सामना गुजरात संघाने ७ विकेट्सने जिंकला. यासह त्यांनी त्यांचे पहिले-वहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. तसेच, राजस्थानच्या दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या आशेवर पाणी फेरले. हा सामना झाल्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यामध्ये ‘फेअर प्ले’ पुरस्कार गुजरात आणि राजस्थान संघांना मिळाला.
कुणाला मिळतो हा ‘फेअर प्ले’ पुरस्कार?
फेअर प्ले अवॉर्ड आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून दिला जातो. हा पुरस्कर त्या संघाला दिला जातो, ज्या संघाने संपूर्ण स्पर्धा खिलाडूवृत्तीने खेळली आहे. प्रत्येक संघाला त्यांच्या सामन्यानंतर प्लेअर प्लेचे म्हणजेच खिलाडूवृत्तीचे गुण दिले जातात. स्पर्धेच्या शेवटी ज्या संघाचे सर्वाधिक गुण होतात, त्या संघाला हा पुरस्कार मिळतो.
यंदाच्या हंगामात हा पुरस्कार राजस्थान गुजरात आणि राजस्थानने जिंकला आहे. तसेच, या पुरस्काराचा इतिहास पाहता सर्वाधिकवेळा हा पुरस्कार एमएस धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकला आहे. त्यांना ६ वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. या लेखात आपण आत्तापर्यंत ज्या संघांना ‘फेअर प्ले’ पुरस्कार मिळाला आहे, त्यांचा आढावा घेऊ.
फेअर प्ले अवॉर्ड जिंकणारे संघ
२००८ – चेन्नई सुपर किंग्स
२००९ – किंग्स इलेव्हन पंजाब
२०१० – चेन्नई सुपर किंग्स
२०११ – चेन्नई सुपर किंग्स
२०१२ – राजस्थान रॉयल्स
२०१३ – चेन्नई सुपर किंग्स
२०१४ – चेन्नई सुपर किंग्स
२०१५ – चेन्नई सुपर किंग्स
२०१६ – सनरायझर्स हैदराबाद
२०१७ – गुजरात लायन्स
२०१८ – मुंबई इंडियन्स
२०१९ – सनरायझर्स हैदराबाद
२०२० – मुंबई इंडियन्स
२०२१ – राजस्थान रॉयल्स
२०२२- राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स*
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2022: फायनलमधील जबरदस्त फटकेबाजीमुळे हार्दिक पंड्या बनला सामनावीर, पाहा याआधीचे ‘मॅन ऑफ द मॅच’
नाद करा पण आमचा कुठं! आयपीएलची पर्पल कॅप डोक्यावर मिरवणारे गोलंदाज, चहल राजस्थानचा पहिला रॉयल खेळाडू