---Advertisement---

फखर झमान सलामीला का आला नाही? ‘हे’ आहे कारण…

---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. 321 धावांच्या मोठे लक्ष गाठत असताना, पाकिस्तानच्या डावाची सुरुवात बाबर आझमने सौद शकीलसह केली कारण आयसीसीच्या नियमांमुळे फखर झमानवर बंदी घालण्यात आली होती. फखर झमान का आणि कोणत्या नियमामुळे सलामीला येऊ शकला नाही ते जाणून घ्या.

फखर झमानला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि तो पहिल्याच षटकात मैदानाबाहेर गेला. तो 33 व्या षटकात 135 मिनिटांनी मैदानात परतला. पाकिस्तानी गोलंदाजीदरम्यान तो फक्त 110 मिनिटे मैदानावर राहिला. तो नियोजित वेळेपेक्षा कमी वेळ मैदानावर राहिला. आयसीसीच्या नियमांनुसार, पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान फखर झमान पहिल्या 25 मिनिटांसाठी मैदानावर येऊ शकत नव्हता. त्याच्या जागी, सौद शकीलने बाबर आझमसोबत पाकिस्तानी डावाची सुरुवात केली.

क्रिकेटच्या नियम 25.3 नुसार, जर फलंदाजी करणाऱ्या संघातील एखाद्या खेळाडूने पेनल्टी वेळ पूर्ण केली नसेल, तर त्या खेळाडूला पेनल्टी वेळ पूर्ण होईपर्यंत फलंदाजी करण्याची परवानगी नाही. जर न्यूझीलंडचा डाव पाकिस्तान वेळेनुसार संध्याकाळी 6.25 वाजेपर्यंत चालू राहिला असता तर फखर झमानचा पेनल्टी टाइम पूर्ण झाला असता. दरम्यान तो डाव सुरू करू शकला असता पण न्यूझीलंडचा डाव संध्याकाळी 6:05 वाजता संपला. यामुळे बाबर आझमसोबत सलामीला सलामीला यावे लागले.

आयसीसीच्या नियमांमुळे फखर झमान तिसऱ्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकत नव्हता. खरंतर, चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सौद शकील 6 धावा काढून बाद झाला. या काळात पाकिस्तानी डावाचे 20 मिनिटेही पूर्ण झाले नाहीत, त्यामुळे कर्णधार मोहम्मद रिझवानला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे लागले.

हेही वाचा – 
तिकिटांची किंमत एवढी कमी तरी कराची स्टेडियम रिकामे का?
CT 2025; पहिल्या सामन्यात किवींचा तडाखा, पाकिस्तानपुढे 320 धावांचे आव्हान!
“चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 6 महिने आतंकी हल्ला, 16 वर्षांपूर्वी हादरला पाकिस्तान; जगभर बदनामी”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---