विश्वचषक 2023चा 35वा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने 50 षटकात 6 विकेट्स गमावून 401 धावा केल्या होत्या, पण तरीही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडच्या पराभवाचे कारण पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज फखर जमान होता, ज्याने पाकिस्तानसाठी एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले.
फखर जमान (Fakhar Zaman) याने 81 चेंडूत 11 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 126 धावांची झंझावाती खेळी खेळली, ज्याच्या जोरावर पाकिस्तान संघाने अवघ्या 25.3 षटकात केवळ 1 विकेट्स गमावून 200 धावा केल्या, पण त्यानंतर खेळ झाला नाही. पावसामुळे ते शक्य झाले नाही आणि डीएलएसच्या आधारे पाकिस्तानला 21 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ या विजयाने आणि फखरच्या खेळीमुळे इतके खूश झाले की, त्यांनी फखरला फोन करून त्याचे कौतुक केले आणि त्याच्यासाठी रोख बक्षीसही जाहीर केले.
पीसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील पोस्टनुसार, झका अश्रफने फखर जमानला फोन करून त्याच्या 126 धावांच्या नाबाद खेळीचे कौतुक केले आणि 10 लाख रुपयांची बक्षीस रक्कमही जाहीर केली.
कर्णधार बाबर आझमनेही पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने दुसऱ्या विकेट्ससाठी फखर जमानसोबत 194 धावांची नाबाद भागीदारी केली. बाबरने 63 चेंडूत 66 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली आणि एका बाजुने फखरला साथ दिली.
विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तान संघाने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत त्यातील 4 सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. 8 गुणांसह ते गुणतालिकेत आता 5व्या स्थानी पोहचला आहे. (Fakhar Zaman stunning century makes PCB president happy announces reward many lakhs)
म्हत्वाच्या बातम्या
“त्यामुळे भविष्यात मुलांची नावे रोको असतील”, गावसकरांनी केले मोठे भाकित, वाचा सविस्तर