भारतात सध्या वनडे विश्वचषक खेळला जात आहे. या विश्वचषकात न्यूझीलंड संघाची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र राहिली असून, त्यांनी चार पराभव व चार विजय पाहिले आहेत. असे असले तरी आपला पहिला विश्वचषक खेळणारा न्यूझीलंडचा 23 वर्षीय अष्टपैलू रचिन रवींद्र याने आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेल्या रचिन याचे भारताचे माजी कर्णधार व सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी विशेष कौतुक केले.
रचिन याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करताना शतक पूर्ण केले. हे त्याचे विश्वचषकातील तिसरे शतक ठरले. त्याने आतापर्यंत स्पर्धेत आठ सामने खेळताना तीन शतके व दोन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे तो भविष्यात मोठा खेळाडू होईल असे सर्वजण बोलताना दिसत आहेत.
रचिन हा भारतीय वंशाचा असून, त्याच्या वडिलांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड यांच्या नावांना एकत्र करत रचिन असे नाव ठेवले आहे. याच गोष्टीचे उदाहरण देत बोलताना गावसकर म्हणाले,
“रचिनचे नाव जशाप्रकारे ठेवले गेले आहे ते अत्यंत वेगळे वाटते. तो जसा खेळतोय त्यामुळे तो हे नाव सार्थ करतोय हे नक्की. मला असे देखील वाटते की, भविष्यात लोक आपल्या मुलांचे नाव रोहित शर्माचा रो व विराट कोहलीचा को घेत रोको असे देखील ठेवू शकतात.”
याबाबत आता सोशल मीडियावर देखील अनेक जण चांगलीच चर्चा करताना दिसत आहेत.
(Sunil Gavaskar Predict Peoples Starts Name Trend Of ROKO)
हेही वाचा-
CWC 23: भारताला पहिला धक्का! जबरदस्त सुरुवात करून देणाऱ्या रोहितची रबाडाने काढली विकेट
कोलकात्यात टॉस जिंकून रोहितचा दक्षिण आफ्रिकेला धक्का! बावुमासेनेत मोठा बदल, पाहा Playing XI