---Advertisement---

यंदा केकेआर आयपीएल विजेतेपद जिंकणार का? शाहरुख खानने दिले भन्नाट उत्तर

On: बुधवार, मार्च 31, 2021 11:43 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला आता केवळ ९ दिवस शिल्लक आहेत. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या या १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगमासाठी सर्वच संघांची सुरुवात झाली असून आयपीएलची ट्रॉफी उचलण्यास प्रत्येक संघच उत्सुक आहे. यादरम्यान प्रत्येक संघाशी जोडलेले अनेक सदस्यही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. यात कोलकाता नाईट रायडर्सचा सहसंघमालक शाहरुख खानचाही समावेश आहे.

नुकतेच ट्विटरवर एका चाहत्याने शाहरुखला एक प्रश्न विचारला होता. ज्याचे मजेशीर उत्तर किंग खान म्हणून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुखने दिले. चाहत्याने शाहरुखला विचारले की ‘भाई, केकेआर यावेळी कप आणणार ना?’

चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखने उत्तर दिले की ‘मला आशा आहे. मला त्यातच कॉफी प्यायला सुरुवात करण्याची इच्छा आहे.’

शाहरुख अनेक क्रिकेटप्रमी सेलिब्रेटींपैकी एक आहे. तो अनेकदा आयपीएलमधील केकेआरच्या सामन्यांसाठी स्टेडियममध्ये उपस्थित असतो. तसेच केकेआरला प्रोत्साहन देत असतो. मागीलवर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही तो दुबईमध्ये केकेआरला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता.

केकेआर २ वेळचे आयपीएल विजेते 

केकेआरने याआधी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली २०१२ आणि २०१४ साली आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. त्यांनी २०१२ साली चेन्नई सुपर किंग्सला अंतिम सामन्यात पराभूत केले होते. तर २०१४ साली किंग्स इलेव्हन पंजाबला अंतिम सामन्यात पराभूत केले होते. त्यानंतर केकेआरला विजेतेपद जिंकता आलेले नाही.

तसेच सर्वाधिक आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या यादीत केकेआर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत प्रथम क्रमांकावर ५ विजेतेपदांसह मुंबई इंडियन्स आहे. तर ३ विजेतेपदांसह चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या क्रमांकावर आहे.

केकेआरची सुरुवात चेन्नईमधून

यंदाच्या आयपीएल २०२१ चे आयोजन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने ते थोडे वेगळ्याप्रकारे करण्यात आले आहे. यंदा कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक संघ साखळी फेरीदरम्यान केवळ ३ वेळाच प्रवास करेल अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कोणताही संघ यंदा आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणार नाही.

त्यामुळे केकेआर त्यांचे पहिले ३ साखळी फेरीचे सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे. त्यानंतरचे साखळी फेरीतील २ सामने मुंबईमध्ये होतील, तर त्यानंतर केकेआरचे अहमदाबादला ४ आणि बेंगलोरला ५ साखळी फेरीतील सामने होणार आहेत. केकेआरचा पहिला सामना ११ एप्रिलला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

असे आहेत आयपीएल २०२१ मधील कोलकाता नाईट रायडर्सचे साखळी फेरीतील सामने-

११ एप्रिल – चेन्नई, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७० वाजता
१३ एप्रिल – चेन्नई, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ एप्रिल – चेन्नई, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, दुपारी ३.३० वाजता
२१ एप्रिल – मुंबई, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, संध्याकाळी ७.३० वाजता
२४ एप्रिल – मुंबई, राजस्थान रॉयल्स विरुद्ध विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२६ एप्रिल – अहमदाबाद, पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२९ एप्रिल – अहमदाबाद, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
३ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
८ मे – अहमदाबाद, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वाजता
१० मे – बंगळुरू, मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१२ मे – बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
१५ मे – बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग, संध्याकाळी ७.३० वाजता
१८ मे – बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
२१ मे – बंगळुरू – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वाजता

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2021: धोनीच्या चेन्नईविरुद्ध पहिलाच सामना खेळताना ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर होणार ‘हा’ मोठा रेकॉर्ड

वयाच्या २३ व्या वर्षी आयपीएलमध्ये नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर रिषभ पंत म्हणाला…

‘या’ कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज करेल संघर्ष, भारतीय दिग्गजाने व्यक्त केले मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---