सध्या भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत यातील ४ कसोटी सामने झालेले आहेत. ज्यात भारतीय संघाने २-१ ने आघाडी मिळवली आहे. त्यानंतर ५ वा कसोटी सामना शुक्रवारी (१० सप्टेंबर) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार होता. मात्र यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. याबाबत आता भारतीय चाहत्यांनी स्वतःला भारताचा चाहता म्हणवणाऱ्या ‘जार्वो’वर याचे खापर फोडले आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील सामन्यादरम्यान ‘पीच इनवेडर’ म्हणून प्रसिद्ध झालेला ‘जार्वो ६९’ ३ वेळा विनापरवानगी मैदानात घुसला होता. जार्वो ६९ चे खरे नाव ‘डॅनियल जारविस’ असे आहे. तो स्वतःला भारतीय संघाचा खूप मोठा चाहता म्हणवून घेतो. त्याने मैदानात घुसतेवेळी भारतीय संघाची जर्सी परिधान केली होती. ज्यामध्ये त्याचे जार्वो ६९ असे नाव होते. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी देखील त्याचे नामकरण जार्वो ६९ असेच केले.
https://twitter.com/CricketMate_/status/1426534049607294987?s=20
Official #Jarvo69 Becoming the 1st white Indian batsman in England vs India 3rd Test Cricket Match!
FULL VIDEO: https://t.co/2QIZxdPNWU pic.twitter.com/XygOhFD4C8
— Jarvo69 (Daniel Jarvis) (@BMWjarvo) August 28, 2021
#Jarvo69 New Video: India's First White Bowler!
FULL VIDEO HERE = https://t.co/Mv0QJV3334 pic.twitter.com/zOs0IQHZjS
— Jarvo69 (Daniel Jarvis) (@BMWjarvo) September 5, 2021
पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सहयोगी फिजियो योगेश परमार यांना गुरुवारी (९ सप्टेंबर) कोरोनाची लागण झाली. ज्यानंतर खूप खळबळ माजली होती. कारण या पूर्वीच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मुख्य फिजिओ कोरोना संक्रमित झाले होते. त्यामुळे यानंतर मॅंचेस्टरमध्ये होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला.
https://twitter.com/TiredOfProcess/status/1436244374183055364?s=20
Has anyone told Jarvo yet?
Is he still hiding under the covers?#ENGvIND ????
— Pete Selby ????️ (@peteselby) September 10, 2021
The Bio-bubble we were all hearing about in the last few months was never a priority in the current Ind-Eng series.
1. Jarvo breached the security line 3 times.
2. Mostly it was a full house in Stadium.
We cannot expect a very secure Covid-free environment with such conditions.— Aditya Paliwal (@AdiPali2016) September 10, 2021
https://twitter.com/belongs2raghu/status/1436248506105139200?s=20
https://twitter.com/imRohannn/status/1436272924835528708?s=20
What Covid breach are the English talking about when they themselves are unable to prevent people from entering the field!#jarvo #INDvsENG
— snigdharup banerjee (@snigD) September 10, 2021
या निर्णयानंतर चाहते चांगलेच नाराज झाले. यानंतर चाहत्यांनी डॅनियल जारविस म्हणजेच जार्वोवर चांगलाच निशाणा साधला. भारतीय चाहत्यांच्या मते जार्वोचे ३ वेळा मैदानात घुसणे, ही एक विचारपूर्वक योजना होती. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी जार्वोला मॅंचेस्टरचा सामना रद्द करण्यास जबाबदार ठरवले आहे.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर खेळाडूंमध्ये बायो बबलचे कठोर नियम पाळले जातात. अशात जर बाहेरची एखादी व्यक्ती सारखी सारखी मैदानात घुसत असेल, तर खेळाडूंना यामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे इंग्लंडच्या व्यवस्थापनेवर देखील प्रश्न उपस्थित राहतो. या दरम्यान जार्वोला हा सामना रद्द होण्याला जबाबदार ठरवत अनेक चाहत्यांनी असे ट्विट केले.
महत्त्वाच्या बातम्या –
–ईसीबीचा बीसीसीआयवर घाला, मँचेस्टर कसोटीमुळे झालेल्या ३०४ कोटींच्या नुकसानाची मागितली भरपाई!
–धोनी धोनी हैं! आमदार महेश लांडगेही आहेत कट्टर धोनी फॅन, कमबॅकवर म्हणाले…
–‘इंग्लंड दौऱ्याची निराशा दूर करण्यासाठी अश्विनला टी२० विश्वचषकात निवडले गेले’, माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया





