वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाकडून 6 विकेट्सने पराभूत झाला. हा ऑस्ट्रेलियाचा 6 वा विश्वचषक किताब ठरला. दुसरीकडे, भारताचे 12 वर्षांनंतर तिसरा विश्वचषक किताब जिंकण्याचे स्वप्न तुटले. हाच धक्का काही चाहात्यांना सहन झाला नाही.
एका आघाडीच्या वृत्त संस्थेने दिलेल्या बातमीनुसार पश्चिम बंगाल येथील एका 23 वर्षाच्या तरुणाने भारतीय संघाच्या पराभवानंतर निराश होत जीवन यात्रा संपवली. कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या या तरुणाने अंतिम सामना पाहण्यासाठी खास सुट्टी घेतली होती. मात्र, भारतीय संघाच्या पराभवामुळे तो दुःखी झालेला. त्या तरुणाचे राहुल असे नाव सांगण्यात येत आहे.
तर तिरुपती येथील एका 32 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणाला देखील सामन्यादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले गेले. मात्र, तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली.
अंतिम सामन्याविषयी बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने विराट कोहली व केएल राहुल यांच्या अर्धशतकांमुळे 241 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची शतकी खेळी व त्याला मार्नस लॅब्युशेन याने नाबाद अर्धशतक करून साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवला.
(Fan Commited Suicide After India Lost In ODI World Cup Final One Fan Died Due To Heart Attack)
हेही वाचा-
World Cup Final मध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचे पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन, ड्रेसिंग रूममध्ये पोहचून…
World Cup गमावला तरी ICC ने केला रोहितचा सन्मान, इतर 5 भारतीयांनाही मिळाले मानाचे स्थान, वाचा सविस्तर