ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे म्हणजेच 26 डिसेंबर रोजी कसोटी सामना सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने अप्रतिम प्रदर्शन केले. ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्न याच्या निधनानंतर हा पहिलाच बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. उभय संघांतील हा सामना मेलबर्नच क्रिकेट ग्राउंडवर खेळल जात असून यात वॉर्नच्या सन्मानार्थ खेळाडू आणि चाहत्यांनी हॅट घातल्याचे पाहायला मिळाले.
शेन वॉर्र (Shane Warne) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजंपैकी एक आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 708 विकेट्स घेतल्या, ज्या या फॉरमॅटमधील दुसऱ्या सर्वाधिक विकेट्स आहेत. यादीत पहिला क्रमांकाल श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनचा आहे. मुरलीधरनच्या नावावर 800 कसोटी विकेट्सची नोंद आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या दुसऱ्या कसोटी सामन्यात चाहते आणि खेळाडू वॉर्नच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात वॉर्नप्रमाणेच गोल हॅट घालून मैदानात उतरला.
तसेच एमसीजे स्टेडियममध्ये मैदानात वॉर्नी 350 असे लिहिलेले देखील पाहायला मिळाले. वॉर्नच्या कसोटी कॅपचा क्रमांक 350 असल्यामुळे मैदानात हे शब्द लिहिण्यात आले. सामन्याच्या पहिल्या दिवशी दुपारचे 3 वाजून 50 मिनिटे झाल्यावर खेळ काही मिनिटांसाठी थांबला गेला. यावेळी खेळाडू आणि चाहते वॉर्नच्या आढवणीत रमले. दिग्गजाला आढवणीत सर्वांनी डोक्यावर हॅट हातात घेतली आणि सर्वजण जागेवर उभा देखील राहिले.
The MCG crowds stand and salute to Shane Warne at the occasion of 3.50.pic.twitter.com/SV7I6QULbs
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 26, 2022
दरम्यान वॉर्न आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंड यांचे खास नाते देखील आहे. वॉर्नने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 700 वी विकेट याच मैदानावर घेतली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या सामन्यादरम्यान वॉर्नच्या आठवणीत इतर काही कार्यक्रम देखील आयोजित केले होते. यात वॉर्नरचे आयुष्य आणि कारकिर्दीत एमसीजी स्टेडियमची भूमिका देखील सांगण्यात आली. वॉर्नने त्याच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत एकूण 145 कसोटी सामने केळले आहेत. 4 चार मार्च 2022 रोजी थायलंडमध्ये असताना ह्रदयविकाराच्या थटक्याने वॉर्नचे निधन झाले. वयाच्या 52 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. (Fans get emotional remembering Shane Warner during Boxing Day Test, watch video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह कार्यक्रमात गेलचा अनिल कुंबळेंवर आयपीएल कारकीर्द संपवल्याचा आरोप; म्हणाला…
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित-राहुलचा पत्ता कट? कारणही घ्या जाणून