वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना त्रिनिदाद येथे खेळला जातोय. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने विजय मिळवल्याने मालिका बरोबरीत आहे. या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघात रोहित शर्मा व विराट कोहली यांना पुन्हा एकदा विश्रांती दिली गेली. मात्र, संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवला होता. मात्र यामध्ये रोहित सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला. तर, विराटने फलंदाजी केली नाही. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात या दोघांनी विश्रांती घेतली. भारतीय संघ हा सामना पराभूत झाला. तिसऱ्या सामन्यात हे दोघेही खेळतील अशी अपेक्षा असताना त्यांना बाहेरच ठेवण्यात आले.
विराट व रोहित या मालिकेमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये होते. रोहितने तीन डाव खेळताना एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली होते. तर विराटने एक शतक व एक अर्धशतक मारलेले. अशा परिस्थितीत चांगला फॉर्म असतानाही त्यांनी न खेळणे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. हे दोघे आता थेट आशिया चषकात खेळताना दिसतील. कारण, वेस्ट इंडीज व आयर्लंडविरूद्ध होणाऱ्या टी20 मालिकांमध्ये हे दोघेही सहभागी होणार नाहीत. त्यामुळे ऐन आशिया चषक व विश्वचषकात त्यांचा फॉर्म गेल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ आशिया चषकात सहभागी होईल. भारताचा मुख्य सामना पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे होणार आहे. त्यानंतर नेपाळ विरुद्ध भारतीय संघ खेळेल. यानंतर सुपर फोर व अंतिम फेरी खेळली जाईल.
(Fans Questions Rohit And Virat Rest Against West Indies)
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब; वेगवान गोलंदाजाचे एक वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन
रिंकूचे नशीब फळफळले! 18 दिवसात 2 वेळा मिळाली टीम इंडियात जागा; म्हणाला, ‘दररोज 6 तास…’