---Advertisement---

ऋतुराजवर अन्याय झालाय?, जबर फॉर्ममध्ये असूनही खेळण्याची संधी न दिल्याने भडकले भारतीय चाहते

On: सोमवार, जानेवारी 24, 2022 10:36 AM
ruturaj-gaekwad
---Advertisement---

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (South Africa vs India) संपन्न झाला आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाच्या हाती काहीच लागले नाही. या मालिकेतील कसोटी सामन्यात भारतीय संघाला २-१ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. तर वनडे मलिकेत देखील ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. वनडे मालिकेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात देखील ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे चाहते भलतेच नाराज झाले आहेत. दरम्यान चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे आपला संताप व्यक्त केला आहे. (Fan’s reactions after Ruturaj Gaikwad not picked up in playing 11)

ऋतुराज गायकवाडने आयपीएल स्पर्धेत आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. ही कामगिरी पाहता त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. परंतु केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात त्याला एकही वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघातील फलंदाज या संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरले.

चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया
ऋतुराज गायकवाडला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये संधी नाही मिळाली हे पाहून एका युजरने ट्विट करत लिहिले की, “खराब व्यवस्थापन. ऋतुराजला संघात स्थान का नाही? त्याच्यावर खरोखरच अन्याय झाला आहे. प्लेइंग ११ मध्ये येण्यासाठी त्याला आणखी काय करावे लागेल. आयपीएल आणि विजय हजारे स्पर्धेत त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.”

तसेच दुसऱ्या एका युजरने ट्विट करत लिहिले की, “ऋतुराज गायकवाड आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे, तरीदेखील त्याला खेळण्याची संधी नाही..”

https://twitter.com/Sportscasmm/status/1485162505546600449?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1485162505546600449%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fsa-vs-ind-3rd-odi-2022-ruturaj-gaikwad-did-not-get-a-place-in-the-playing-xi-again-fans-furious-hindi-2724835

https://twitter.com/satvik_csk/status/1485162371585015810?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1485162371585015810%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fsa-vs-ind-3rd-odi-2022-ruturaj-gaikwad-did-not-get-a-place-in-the-playing-xi-again-fans-furious-hindi-2724835

तसेच एका युजरने राहुल द्रविड आणि केएल राहुलबद्दल ट्विट करत लिहिले की, “राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून आणि केएल राहुलचा कर्णधार म्हणून माझ्यावर फारसा प्रभाव पडलेला नाहीये. ऋतुराज गायकवाडला श्रीलंका दौऱ्यावर संधी दिली नाही. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या मालिकेत दुर्लक्ष केले गेले आणि आता या दौऱ्यावरही. तसेच वेंकटेश अय्यरचाही योग्यरित्या वापर करून घेता आला नाही.”

महत्वाच्या बातम्या :

राज बावाने तोडला धवनचा १८ वर्ष जुना विश्वविक्रम! युवराजशी आहे खास नाते

हे कोरोना! टीम इंडियाच्या बहुप्रतिक्षित मालिका आयोजनात करावे लागले बदल; वाचा सविस्तर

हे नक्की पाहा:

आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---