आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे आणि अशातच भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणास्तव विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झालाच्या बातम्या समोर येत आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. बुमराहच्या दुखापतीनंतर चाहते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अनेकजण आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि त्याचसोबत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्यावरही टीका करत आहेत.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीच्या कारणास्तव आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये खेळू शकला नव्हता. अशातच तो आगामी टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेत देखील खेळणार असल्याची बातमी, चाहत्यांसाठी धक्कादायक ठरत आहे. अनेकजण बुमराह विश्वचषकात खेळणार नसल्यामुळे निराश आहेत, तर अनेकजण त्याच्यावर टीका देखील करत आहेत. मागच्या वर्षी आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने बुमराहला मोठी किंमत मोजून संघात रिटेन केले होते. तसेच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतग्रस्त असून देखील त्याला कोट्यावधी रुपये देत संघात सामील केले होते.
याच पार्श्वभूमीवर चाहते नाराज दिसत आहेत. चाहत्यांच्या मते बुमराह आणि आर्चरसारखे खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकतात, पण देशासाठी खेळताना नेमकी त्यांना दुखापत होते. सोशल मीडियावर सध्या याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच अनेक मजेशीर मिम्स देखील पाहायला मिळत आहेत.
Bumrah and Archer landing at Wankhede on 29th March for IPL opener. pic.twitter.com/RWof04fAAe
— Viroot (@topgun_mav11) September 29, 2022
मुंबई इंडियन्सने या दोघांना आयपीएल 2023 चा विचार करून खरेदी केले होते. कारण जोफ्रा आर्चर मागच्या हंगामात खेळणार नाही, हे त्याने आधीच स्पष्ट केले होते. तरीही मुंबईने मोठी रक्कम खर्च केली, जेणेकरून पुढच्या हंगामात बुमराह आणि आर्चर मिळून विरोधी संघांचा घाम काढू शकतील. दरम्यान, आयपीएलचा मागचा हंगाम संपल्यानंतर बुमराहला सतत दुखापत होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आर्चरच्या फिटनेसविषयी देखील अद्याप काही सकारात्मक चित्र दिसत नाहीये. आर्चर मागच्या 20 महिन्यांपासून इंग्लंड संघातून बाहेर आहे. दुसरीकडे बुमराह तब्बल दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून त्याने माघार देखील घेतली.
https://twitter.com/Hawwmad/status/1575437951525347329?s=20&t=uzk5N99tVXavQaS5HOwDsg
आगामी टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. भारताला विश्वचषकातील पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. माहितीनुसार बुमराहला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान चार आठवडे लागू शकतात. दरम्यानच्या काळात बुमराह बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमध्ये रिहॅब करेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला टी-20 विश्वचषक संघात राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले होते. बुमराह संघातून बाहेर झाल्यानंतर आता त्याला मुख्य संघात संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
Welcome Again 😒 pic.twitter.com/EOW9VWiC5p
— 🇮🇳 ꪜ𝐢𝐧𝐨 (@vinoo_96) September 29, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्यांच्यासोबतच असे झाले पाहिजे’, दिप्ती शर्माच्या रन आउट वादावर बोलली एलिस पेरी
ऑस्ट्रेलिया लिजेंड्सला धूळ चारत सचिनची इंडिया लिजेंड्स फायनलमध्ये, दोन दिवस चालला उपांत्य सामना
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीच्या टेंशनमध्ये वाढ, कोणते पर्याय आहेत संघाकडे?