समारा | २०१८ च्या फिफा विश्वचषकात शनिवारी (७ जुलै) झालेल्या इंग्लंड वि. स्वीडन यांच्यातील उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.
या सामन्यात इंग्लंडकडून ३० व्या मिनिटाला हॅरी मैग्यूरो आणि डेल अलीने ५८ व्या मिनिटाला हेडरद्वारे अप्रतिम गोल करत इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.
समारा फुटबॉल अरेना येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा पराभव करत तब्बल २८ वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
यानंतर तब्बल २८ वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या इंग्लंड फुटबॉल संघावर क्रिकेट आणि फुटबॉलमधील अनेक दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला.
यामध्ये क्रिकेट विश्लेषक हर्षा भोगले, इंग्लंडचा क्रिकेटपटू जेम्स अॅंडरसन, माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन आणि इंग्लंडचे प्रथम श्रेणा क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्लेषक अॅलन विल्कीन्स यांचा समावेश आहे.
England have had a dream draw at the World Cup but they are making the most of it. They were magnificent today.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) July 7, 2018
Everyone round ours Wednesday! It’s coming home!!!! ⚽️⚽️⚽️⚽️⚽️ #WorldCup
— James Anderson (@jimmy9) July 7, 2018
World Cup Semi final party at mine … All welcome 🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 7, 2018
Fantastic effort 🏴 A young team with no fear! Wonderful to watch!
The dream continues for England 🏴 And we in Wales are behind you! 🏴— Alan Wilkins (@alanwilkins22) July 7, 2018
The dream is alive…#WorldCup #ENG #PL pic.twitter.com/HQgM5c0aLd
— Premier League (@premierleague) July 7, 2018
Yeah so a good header doesn’t hurt. I mean the moment you head it proper, you feel it’s a good one. Know what I mean love? pic.twitter.com/a5b8UqDjv2
— Kyle Walker (@kylewalker2) July 7, 2018
It’s official… Football’s Coming Home Again!! Big respect to the @england team & Gareth! Wanna see the scenes back home… tag me people! Love it #ENG #WorldCup 🏴🏆 pic.twitter.com/kiLgkMPbWx
— Rio Ferdinand (@rioferdy5) July 7, 2018
आजपर्यंतच्या २१ फिफा विश्वचषकापैकी १५ विश्वचषकात सहभागी झालेल्या इंग्लंडने १९६६ साली प्रथम एकमेव विश्वचषक जिंकाला आहे.
आपल्या दुसऱ्या विश्वचषक विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेला इंग्लंड संघाने २०१८ फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडत मारत विजेतेपदाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.
उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यातील विजयी इंग्लड आता अंतिम सामन्यात आपले तिकीट फिक्स करण्यासाठी बुधवारी (११ जुलै) क्रोएशिया विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन हात करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-एशियन गेम्ससाठी भारतीय महिला आणि पुरुष कबड्डी संघाची घोषणा
-२०१० साली झालेल्या आयपीएल स्पर्धेतील मोठ्या घटनेचा खुलासा