---Advertisement---

सुनील छेत्रीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, मेस्सीला पछाडत ‘या’ विक्रमात ठरला दुसरा

On: मंगळवार, जून 8, 2021 12:23 PM
---Advertisement---

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आपली चमकदार कामगिरी, २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धा आणि २०२३ आशिया चषक पात्रता फेरीत देखील सुरू ठेवली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीमध्ये बांगलादेश संघाचा २-० धुव्वा उडवत भारतीय फुटबॉल संघाने जोरदार विजय मिळवला आहे. या विजयासोबतच सुनील छेत्रीने आणखी एक मोठा कीर्तिमान आपल्या नावावर केला आहे.

सुनील छेत्रीने अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेसी याला सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत मागे टाकले आहे. सुनील छेत्री हा ख्रिस्तीयानो रोनाल्डोनंतर सर्वाधिक गोल करणारा फ़ुटबॉलपटू ठरला आहे. असा कारनामा करणारा सुनील छेत्री पहिलाच भारतीय फुटबॉलपटू आहे.

या सामन्यात सुनील छेत्रीने ७९ व्या मिनिटात गोल करत संघाचे खाते उघडले होते. त्यानंतर शेवटच्या क्षणांमध्ये आणखी एक गोल करत त्याने या सामन्यात भारतीय संघाचा विजय निश्चित केला होता. ३६ वर्षीय सुनील छेत्रीच्या नावे आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ७४ गोल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पोर्तुगालच्या दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोच्या नावे सर्वाधिक १०३ गोल आहेत. त्यानंतर सुनील छेत्री हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॉप १० मध्ये येण्यासाठी अवघे काही गोल शिल्लक
यासोबतच सर्वाधिक गोल करण्याऱ्या सर्वकालीन खेळाडूंच्या यादीत सुनील छेत्री ११ व्या क्रमांकावर आहे. तसेच १० व्या क्रमांकावर तीन खेळाडू आहेत. यामध्ये हंगरीचा सेंडर कोसिक्स, जपानचा कुणिशिगे कामटो आणि कुवैतचा बशर अब्दुल्लाह यांच्या नावे प्रत्येकी ७५-७५ गोल आहेत.

या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला विजय
भारतीय संघाचा पहिला सामना कतार संघाविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारतीय संघाला १-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघाचा पुढील सामना येत्या १५ जूनला अफगाणिस्तान संघाविरुद्ध असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

विराटची फुटबॉल किक पाहून फुटबॉलपटूचा प्रश्न, ‘एकच चलन पाठवू की हप्त्यांमध्ये पैसे चुकवणार?’

दुर्दैवी! देशाचे प्रतिनिधित्व केलेली खेळाडू करतेय वीटभट्टीवर काम, क्रीडामंत्र्यांनी घेतली दखल

वर्ल्डकप २०२२ च्या क्वालिफायरसाठी भारतीय फुटबॉल संघ पोहचला दोहा येथे; सुनील छेत्रीचे पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---