---Advertisement---

फिफा विश्वचषक ट्रॉफीची अनोखी कहानी….

On: शनिवार, जून 16, 2018 9:36 AM
---Advertisement---

21व्या फिफा विश्वचषकाला रशियात सुरूवात झाली आहे. जगात फुटबॉलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. या स्पर्धेबरोबरच स्पर्धेतील ट्रॉफीही तेवढीच लोकप्रिय आहे.

आताची ट्रॉफी ही पहिल्या ट्रॉफीचे दुसरे रूप असून पहिल्या ट्रॉफीचे नाव ‘व्हिक्टरी’ म्हणजेच विजय हे होते. मात्र ते बदलून त्याचे नाव फिफाचे चौथे माजी अध्यक्ष ज्युल्स रिमेत यांच्यावरून ‘ज्युल्स रिमेत कप’ असे ठेवण्यात आले होते.

1930 पासून ते 1970 पर्यंत याच नावाने ही ट्रॉफी देण्यात आली. 1946मध्ये रिमेत यांना सन्मानित करण्यासाठी या ट्रॉफीचे नाव बदलण्यात आले. फ्रेंच शिल्पकार आबेल लफ्ल्यूर यांनी या ट्रॉफीचे डिझाईन केले होते.

विजयाची प्राचीन ग्रीक देवता असे या ट्रॉफीचे रूप होते.

1938चा फिफा विश्वचषक विजेते इटलीने आयोजित केला होता. तेव्हाचे फिफा उपाध्यक्ष ओटोरिसो बरासी यांनी हिटलरच्या भीतीने ट्रॉफी बेडमध्ये लपून ठेवली.

त्याकाळी जिंकलेला संघ पुढील तीन वर्षे ट्रॉफी स्वत:कडेच ठेवत होता. ब्राझिलने 1970मध्ये असेच केले. मात्र 1983 मध्ये रीयो दि जानरियोमधील ट्रॉफी चोरीला गेली.

त्याबद्दल असा समज आहे की, चोरांनी ती वितळवली असेल. कारण,ती पुढे कधी मिळालीच नाही.

1974मध्ये म्हणजेच 10व्या फिफा विश्वचषकावेळी नवीन ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीचे डिझाईन सात तज्ञांनी मिळून 53 डिझाईनमधून निवडले.

आताची ट्रॉफी इटलीतील आर्टिस्ट सिल्व्हियो गॅज्निग यांनी डिझाईन केली आहे. त्यांनी युरोपियन लीगच्या कप आणि सुपर कप या दोन ट्रॉफीही डिझाईन केल्या आहेत.

“खालून निघालेल्या रेषा जगाच्या भोवतालून वर जात आहे असे चित्र त्या गोलावर आहे. हा गोल विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या दोन खेळाडूंनी पकडला आहे”,असे वर्णन गॅज्निग यांनी केले.

फिफाच्या ट्रॉफीवर जिंकणाऱ्या संघांचे नाव यावर लिहले जाते. आता यावर फक्त 2038 पर्यंत विश्वचषकातील विजेत्यांची नावे लिहण्यास जागा आहे.

आधी विजेता संघ पुढच्या स्पर्धेतील अंतिम सामन्यापर्यंत ही ट्रॉफी स्वत:कडे ठेवत असे. आता यामध्ये बदल करण्यात आले आहे. सोन्याचा मुलामा दिलेली कांस्य धातूची प्रतिकृती विजेत्या संघाला देण्यात येते.

मूळ ट्रॉफी झूरिचमधील फिफा वर्ल्ड फुटबॉल म्युझियममध्ये आहे. ही ट्रॉफी फक्त ट्रॉफी टूर, पुढील विश्वचषकातील अंतिम ड्रॉ आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी वापरली जाते.

1966लाही फिफाची ट्रॉफी चोरण्यात आली होती. इंग्लंडमधील या स्पर्धेला अवघे चार महिने बाकी असताना वेस्टमिनस्टेर सेन्ट्रल मॉल येथून ही ट्रॉफी चोरीला गेली.

त्याच्या बदल्यात 15000 पौंड एवढी रक्कम त्या चोरांनी मागितली होती. यासाठी पोलिसांनी शोधमोहिम सुरू केली.

ही ट्रॉफी दक्षिण लंडन मधील डेव्ह कॉर्बेट यांचा कुत्रा पिक्लेसला सापडली. डेव्हला 6000 पौंड आणि पिक्लेसला जीवनभरसाठी खाद्य असे बक्षिस मिळाले.

तसेच ट्रॉफीची प्रतिकृती तयार करण्यास 250,000 पौंड एवढा खर्च येणार होता.

2010 मध्ये पण ट्रॉफी चोरण्याचा पुन: प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी स्पेन आणि नेदरलॅंड यांच्यात अंतिम सामना सुरू होता. तेथील सुरक्षा रक्षकांना लगेच चोराला पकडण्यात यश आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment