भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडणार आहे. सध्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरीयनच्या (Centurion) मैदानावर सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी लवकरच संघाची घोषणा करण्यात येणार आहे. ज्यामध्ये युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. यामध्ये दोन असे खेळाडू आहेत, ज्यांच्यात संघात स्थान मिळवण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. (india vs south africa odi series)
नुकताच विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात आंध्रप्रदेश संघाने अप्रतिम कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली. या स्पर्धेत आंध्रप्रदेश संघाला जेतेपद मिळवून देण्यात हिमचाल प्रदेश संघाचा कर्णधार ऋषी धवनने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सर्वधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या आणि टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
या खेळाडूसोबत असेल स्पर्धा
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला एका चांगल्या अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता भासणार आहे. कारण हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. हे तीन खेळाडू वनडे मालिकेच्या निवडीसाठी उपलब्ध असेल याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापक वेंकटेश अय्यरला संधी देऊ शकतात. परंतु आता ऋषी धवनची कामगिरी पाहता, दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
ऋषी धवनची कामगिरी (Rishi dhawan)
ऋषी धवनने विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत ४५८ धावा केल्या आहेत. यासह गोलंदाजी करताना त्याने ८ सामन्यात १७ गडी बाद केले आहेत. ऋषी धवनने यापूर्वी देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ३ वनडे सामन्यात १२ धावा करत १ गडी बाद केला आहे.
वेंकटेश अय्यरची कामगिरी (venkatesh Iyer)
वेंकटेश अय्यरने सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत ५ सामन्यात १५५ धावा केल्या. यासह ५ गडी देखील बाद केले होते. तर नुकताच संपन्न झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने ३७९ धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना ९ गडी बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या :
खरा कर्णधार..! दुखापतीनंतर मैदानावर परतलेल्या बुमराहसाठी कर्णधार कोहलीची मन जिंकणारी कृती
सिराजवर चढला रोनाल्डोचा फिव्हर, पहिली विकेट घेतल्यानंतर जबरदस्त प्रदर्शन करत लुटली मैफिल
हे नक्की पाहा :