रेलीगेशन फेरीतील दुसरी लढत लातूर विजयनगारा विर्स विरुद्ध धुळे चोला वीरांस यांच्यात झाली. दोन्ही संघांना गटात एक सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे पहिला विजय कोण मिळणार याची उत्सुकता लागली होती. सामन्याची सुरुवात तशी चांगली झाली. दोन्ही संघ शांत खेळ करत होते. पहिल्या 5 मिनिटात लातूर कडे 4-3 आघाडी होती.
प्रदीप अकांगिरे आक्रमक चढायानी लातूर संघाने लोन पाडत आघाडी वाढवली. मात्र त्यानंतर धुळे च्या मितेश कदम व मुकेश सोनावणेच्या चतुरस्त्र चढायाच्या जोरावर धुळे संघाने लातूर संघाला ऑल आऊट करत संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला 23-19 अशी आघाडी धुळे संघाकडे होती. त्यानंतर आणखी एक लोन लातुर संघावर पडत धुळे संघाने आपली आघाडी वाढवली.
धुळे संघाने 46-39 असा विजय मिळवत स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवला. धुळे कडून मितेश कदम ने 25 गुण मिळवले. तर मुकेश सोनावणे ने 7 गुण मिळवत चांगली साथ दिली. लातूर कडुन प्रदीप अकांगिरेने 15 गुण मिळवत सुपर टेन पूर्ण केला मात्र तो संघाला विजय मिळुन देण्यात अपयशी ठरला. (Finally Dhule Chola Veerans team opened the account of victory)
बेस्ट रेडर- मितेश कदम, धुळे चोला वीरांस
बेस्ट डिफेंडर्स- तुषार माने,लातूर विजयनगारा विर्स
कबड्डी का कमाल- मुकेश सोनावणे, धुळे चोला वीरांस
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेट लीच्या गामे लागला आरसीबीचा चाहता, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिंदीत केल्या सुचना
विजयी मार्गावर परतण्यासाठी पंजाब-गुजरात सज्ज! नाणेफेक जिंकत हार्दिकचा गोलंदाजीचा निर्णय