चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवारपासून सुरु झाला आहे. एमए चिदंबरम म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने धमाकेदार द्विशतक केले आहे. विशेष म्हणजे रुट त्याच्या कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याने एक खास विश्वविक्रम केला आहे.
कारकिर्दीतील १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा रुट जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला असा पराक्रम करता आलेला नाही.
रुटच्याआधी ८ फलंदाजांनी त्यांच्या १०० व्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली आहे. मात्र, त्यातील कोणालाही २०० धावांचा आकडा पार करता आलेला नाही. त्यातील केवळ इंझमाम -उल- हक यांनीच १८४ धावांची खेळी करत १५० धावांचा टप्पा पार केला होता. अन्य ७ फलंदाज १०० ते १४९ धावसंख्येत बाद झाले आहेत.
जो रुटने भारताविरुद्ध पहिल्या डावात १४३ व्या षटकात आर अश्विनच्या चेंडूवर षटकार मारत द्विशतक पूर्ण केले. त्याने त्याच्या द्विशतक पूर्ण करण्यासाठी ३४१ चेंडू खेळले. यात त्याने १९ चौकार आणि २ षटकार मारले.
कारकिर्दीतील १०० व्या कसोटी सामन्यात सर्वोच्च धावा करणारे फलंदाज –
२०२१ – जो रुट (२०९* धावा)
२००५ – इंजमाम-उल-हक (१८४ धावा)
१९९० – गोर्डन ग्रिनिज (१४९ धावा)
१९८९ – जावेद मियाँदाद (१४५ धावा)
१९६८ – सर कॉलिन कॉवड्रे (१०४ धावा)
२००६ – रिकी पाँटिंग (१४३* धावा)
२०१७ – हाशिम अमला (१३४ धावा)
२०१२ – ग्रॅमी स्मिथ (१३१ धावा)
२००६ – रिकी पाँटिंग (१२० धावा)
२००० – ऍलेक स्टिवर्ट (१०५ धावा)
महत्त्वाच्या बातम्या –
एक नंबर भावा..! गगनचुंबी षटकार ठोकत जो रुटने साजर केलं द्विशतक
IND vs ENG Test Live : इंग्लंडचा कर्णधार जो रुटचा द्विशतकी धमाका, इंग्लडच्या ४ बाद ४४५ धावा
इंग्लंडच्या कॅप्टनचा दीडशतकी धमाका, ब्रॅडमन यांच्या ८४ वर्षांपुर्वीच्या विक्रमाची केली पुनरावृत्ती