---Advertisement---

अमेरिकेच्या धरतीवर पहिले अर्धशतक! उन्मुक्त चंदने शेअर केला ताबडतोड फलंदाजीचा व्हिडिओ

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 1:53 AM
---Advertisement---

भारताचा २८ वर्षीय माजी फलंदाज उन्मुक्त चंदने काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने आता अमेरिकेमध्ये क्रिकेट कारकिर्द घडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो सध्या अमेरिकेमध्ये ‘मायनर क्रिकेट लीग’ स्पर्धेत खेळताना दिसत आहे. याच स्पर्धेत नुकतेच त्याने अर्धशतक झळकावले आहे. या खेळीदरम्यानचा व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे.

उन्मुक्तने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की त्याने अनेक दमदार फटके मारले आहेत. त्याने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘अमेरिकन धरतीवर पहिले अधिकृत अर्धशतक’. उन्मुक्त सध्या अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघाकडून खेळत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार त्याने या संघासह बराच काळासाठी करार केला आहे.

https://twitter.com/UnmuktChand9/status/1429707420448608266

उन्मुक्तने या स्पर्धेतील पहिले अर्धशतक केले असले तरी, त्याचे या स्पर्धेतील पदार्पण खराब राहिले होते. तो पदार्पणाच्या सामन्यात शुन्यावर बाद झाला होता. उन्मुक्त एका आत येणाऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. याबाबतचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

https://twitter.com/PeterDellaPenna/status/1426721949007368192

साल २०१२ मधील १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या उन्मुक्तने काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय सोशल मीडियामधून जाहीर केला होता. त्याने एक भावनिक पत्र पोस्ट केले होते. त्याने या पत्रात सर्वांचे आभार मानले होते. तसेच लिहिले होते की ‘माझे लहानपणापासून भारतीय संघाचे क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते. मात्र, माझे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आयुष्यात मी आतापर्यंत बरेच काही मिळवले आहे.’

याबरोबरच २०१२ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाकडून कर्णधार म्हणून विश्वचषक जिंकणे, हा आयुष्यातला मोठा क्षण असल्याचेही त्याने सांगितले होते.

https://twitter.com/UnmuktChand9/status/1426128504131710980

उन्मुक्त चंदची कारकिर्द 
उन्मुक्त चंदने त्याच्या कारकिर्दीत ६७ प्रथम श्रेणीचे सामने खेळले. यामध्ये त्याने ८ शतके आणि १६ अर्धशतकांसह ३१.५७ च्या सरासरीने ३३७९ धावा केल्या. तसेच त्याने १२० अ दर्जाच्या सामन्यांत ४१.३३ च्या सरासरीने ७ शतके आणि ३२ अर्धशतकांसह ४५०५ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने ७७ ट्वेंटी-२० सामन्यांत १५६५ धावा केल्या आहेत. यात त्याने ३ शतके आणि ५ अर्धशतके केली आहेत.

उन्मुक्त इंडियन प्रीमीयर लीगमध्येही दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचा भाग राहिला आहे. त्याने आयपीएलमध्ये २१ सामने खेळले असून १५ च्या सरासरीने ३०० धावा केल्या आहेत. यामध्ये १ अर्धशतकाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘उर्वशी उर्वशी’ गाण्यावर शिखर धवनचा बहिणींबरोबर धमाकेदार डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल

नात्याला सुरुवात होण्यापूर्वीच फुलस्टॉप? अर्शी खानला वाटतेय अफगानिस्तानी क्रिकेटरशी साखरपुडा मोडण्याची भीती

टी२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग ४ षटकार ठोकणाऱ्या कॅरेबियन खेळाडूचा सिडनी सिक्सर्सबरोबर पुन्हा करार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---