---Advertisement---

पहिल्या टी२०मध्ये ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित करण्यात या ५ भारतीय खेळाडूंनी बजावली मोलाची कामगिरी

On: शनिवार, डिसेंबर 5, 2020 12:12 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने 11 धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 161 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 150 धावाच करता आल्या.

भारताच्या विजयात सर्वच खेळाडूंनी योगदान दिले. मात्र 5 खेळाडूंनी या विजयात महत्वपूर्ण कामगीरी बजावली. आपण या लेखात याच पाच खेळाडूंबद्दल माहिती पाहाणार आहोत.

1)केएल राहुल

भारतीय सलामीवीर शिखर धवन (1 धाव) आणि कर्णधार विराट कोहली ( 9 धावा) लवकर माघारी परतल्यावरही केएल राहुल खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने जबाबदारीने खेळी करत 40 चेंडूत 51 धावा केल्या.

2)रवींद्र जडेजा

भारताच्या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय संघ कठीण परिस्तितीत असताना त्याने अखेरच्या षटकांत तुफानी फटकेबाजी केली. त्याने 23 चेंडूंत पाच चौकार व एका षटकारासह 44 धावांची शानदार खेळी केली.

3)युझवेंद्र चहल

भारताच्या डावाच्या अखेरच्या वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा चेंडू जडेजाच्या डोक्याला लागला. अस्वस्थ वाटत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया डावात तो मैदानात आलाच नाही. त्यामुळे त्याच्या जागी ‘कन्कशन सब्स्टिट्यूट’ म्हणून फिरकीपटू युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली.

चहलनेही संधीचं सोनं केलं. त्याने चार षटकांत 25 धावा देऊन तीन गडी बाद केले. या कामगिरीबद्दल त्याची सामनावीर म्हणून निवड झाली.

4)टी नटराजन

भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजनने या सामन्यातून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण केले. त्याने शानदार गोलंदाजी करत तीन गडी बाद केले. डार्सी शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क यांना त्याने तंबूचा मार्ग दाखवला.

5)वॉशिंग्टन सुंदर

भारताचा युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने किफायतीशीर गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 16 धावा दिल्या. त्याला विकेट घेण्यात अपयश आले असले तरी तो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांविरुद्ध खूपच प्रभावी ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

“कन्कशन पर्याय विचित्र, कदाचित पुढच्या वेळी….”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयानंतर विराटाची अजबच प्रतिक्रिया

“अरे किती हसवशील भाऊ”, राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या सॅमसनच्या त्या फोटोंवर चाहत्यांच्या मजेदार प्रतिक्रिया

“जर नटराजनने बुमराहसारखीच कामगीरी केली, तर…”, सेहवागने दोघांबद्दल सांगितला अजब योगायोग

ट्रेंडिंग लेख –

अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण

HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---