दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यानंतर भारतीय संघाला आनंदित करणारे दुसरी बातमी अवघ्या 24 तासातच समोर आली. नव्या आयसीसी टी20 क्रमवारीत भारताच्या तब्बल पाच फलंदाज टॉप 20 मध्ये आहेत. युवा रिचा घोष हिला या क्रमवारी सर्वात मोठा फायदा होऊन ती 20 व्या क्रमांकावर पोहोचली.
The ongoing #T20WorldCup has brought about several changes in the @MRFWorldwide Women's T20I Player Rankings 📉📈
Details 👇https://t.co/F7LcqUKA6O
— ICC (@ICC) February 21, 2023
मंगळवारी (21 फेब्रुवारी) आयसीसीने महिला फलंदाजांची टी20 क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा बोलबाला दिसून आला. सलग दोन सामन्यात अर्धशतक झळकावणारी संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना ही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तिची सलामीची साथीदार शफाली वर्मा ही देखील अव्वल दहामध्ये दहाव्या क्रमांकावर पोहोचली. त्या व्यतिरिक्त पाकिस्तान विरुद्धच्या विजयात मोठी भूमिका बजावणारी जेमिमा रॉड्रिग्ज बाराव्या व कर्णधार हरमनप्रीत कौर तेराव्या क्रमांकावर कायम आहेत. युवा यष्टीरक्षक रिचा घोष 16 स्थानांची प्रगती करत 20 व्या क्रमांकावर पोहोचली.
गोलंदाजी क्रमवारीचा विचार केल्यास पहिल्या पाचमध्ये देखील भारतीयांचे वर्चस्व दिसून येते. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरूद्ध शानदार गोलंदाजी करणारी दीप्ती शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. तसेच, इंग्लंडविरुद्ध पाच बळी घेणारी वेगवान गोलंदाज रेणुका सिंग प्रथमच पहिल्या पाचमध्ये पोहोचली. त्यानंतर बाराव्या क्रमांकावर असलेल्या स्नेह राणाचा क्रमांक लागतो. गोलंदाजी क्रमवारीसह दीप्ती शर्मा अष्टपैलू क्रमवारीत देखील चौथ्या स्थानी आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त कोणतीही भारतीय खेळाडू पहिल्या 20 मध्ये नाही.
(Five Indian Womens Reach Spots In T20 Batting Rankings IN Top 20 Smriti Harman Richa Jemimah Shafali Include)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिल नव्हेतर ‘हा’ फलंदाज वाटतो स्मिथला ‘फ्युचर सुपरस्टार’, सध्या आहे भलत्याच फॉर्ममध्ये
BREAKING: क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर मॉडेल सपना गिलकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल, सेल्फी प्रकरण चिघळले (mahasports.in)