---Advertisement---

आयपीएल २०१३मध्ये परदेशी खेळाडूमुळे गेला असता चहलचा जीव, बाल्कनीत नेऊन केले होते ‘हे’ कृत्य

On: शुक्रवार, एप्रिल 8, 2022 6:38 PM
Yuzvendra-Chahal
---Advertisement---

आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत असलेला फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्ससोबत केली होती. आयपीएल २०११मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून चहल पहिल्यांदा आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. मात्र, पहिल्या तीन हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मुंबई इंडियन्ससोबत असताना चहलने अनेक खेळाडूंसोबत मैत्री केली, पण यादरम्यान एक असा प्रसंग घडला, ज्यामुळे त्याला मोठा झटका बसला होता.

राजस्थान रॉयल्सने त्यांच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि करुण नायर चर्चा करताना दिसत आहेत. या चर्चेदरम्यान चहलने एका खतरनाक किस्स्याची आठवण काढली, जेव्हा तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) खेळाडू होता. त्याने सांगितले की, आयपीएल २०१३ (IPL 2013) दरम्यान त्याचा जीव गेला असता.

व्हिडिओत युजवेंद्र चहल म्हणाला की, “मी हा प्रसंग कोणालाच सांगितला नाहीये, पण आता लोकांना याविषयी कळेल. ही आयपीएल २०१३ची गोष्ट आहे. जेव्हा मी मुंबई इंडियन्सचा भाग होतो. आमचा एक सामना बेंगलोरमध्ये होता. सामना संपल्यानंतर एक पार्टी होती. तेव्हा त्याठिकाणी एक विदेशी खेळाडू होता, जो पूर्णपणे दारूच्या शनेत होता. मी त्याचे नाव घेणार नाही. तो खूप जास्तच नशेत होता. खूप वेळापासून तो माझ्याकडे बघत होता, नंतर त्याने मला जवळ बोलावले.”

“त्या विदेशी खेळाडूने मला बाहेर नेले आणि १५व्या मजल्याच्या बालकनीत टांगले. माझे दोन्ही हात त्याच्या गळ्यात होते. जर माझी पकड थोडी ढिल्ली पडली असती, तर मी १५व्या मजल्यावर होतो. त्याठिकाणी खूप सारे लोक होते, ज्यांनी हा प्रसंग पाहिला. ते तात्काळ आले आणि प्रसंग कसातरी नियंत्रणात आणला. मी बेशुद्ध झालो, मग लोकांनी मला पाणी पाजले. त्यादिवशी मला समजले की, बाहेर जाताना आपण किती काळजी घेतली पाहिजे. ही एक अशी घटना होती, ज्यामध्ये माझा जीव जाता-जाता वाचला. कारण थोडी चूक झाली असती, तर खाली पडलो असतो,” असे चहल पुढे बोलताना म्हणाला.

दरम्यान, आयपीएल २०२२मधील चहलचे आतापर्यंतचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. राजस्थान रॉयल्ससाठी त्याने या हंगामात सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये ५.४५च्या इकॉनॉमीसह ७ विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---