जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या युवराज सिंगने गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण, त्याला अपेक्षेनुसार निरोप मिळाला नव्हता. २०११ सालच्या विश्वचषकात मालिकावीर बनलेल्या युवराजने खुलासा केला आहे की, कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत निवडकर्त्यांनी त्याच्यासोबत चांगली वागणूक केली नव्हती. तो भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच होता ज्याने युवराजला सांगितले होते की, २०१९सालच्या विश्वचषकात निवडकर्त्यांनी युवराजकडे पाहिलेदेखील नव्हते. MS Dhoni Shows Correct Picture About 2019 World Cup To Yuvraj Singh
न्यूज १८शी बोलताना युवराज म्हणाला की, “कॅन्सरवरती मात केल्यानंतर जेव्हा मी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होतो, तेव्हा कर्णधार विराट कोहलीकडून मला खूप आधार मिळाला होता. पण, २०१९ सालच्या विश्वचषकात माझ्यासोबत झालेल्या अन्यायाचा खरा आरसा दाखवणारा व्यक्ती हा धोनी होता. त्याने मला सत्य सांगितले होते. धोनी मला स्पष्ट म्हणाला होता की, मी जितके करु शकतो, तितके मी केले. पण, त्यावेळी निवडकर्त्यांनी तुझ्यावर एक नजरदेखील टाकली नव्हती.”
२०११ सालच्या विश्वचषक विजयात युवराजने महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याने आपल्या अष्टपैलू प्रदर्शनाने विश्वचषकात दमदार कामगिरी केली होती. युवराजने ९ सामन्यात ३६२ धावा केल्या होत्या. तर, सोबतच १५ विकेट्सही घेतल्या होत्या.
त्या विश्वचषकातील आठवणींना उजाळा देत युवराज म्हणाला की, “विश्वचषकादरम्यान धोनीचा माझ्यावर खूप विश्वास होता. धोनीने स्वत: म्हटले होते की, २०११ सालच्या विश्वचषकात युवराज हा भारतीय संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. पण मी कॅन्सरनंतर जेव्हा पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा संघात खूप बदल झाले होते.”
युवराजने २०१७साली त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर युवराजने १० जून २०१९ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतातील त्या खेळीनंतर तब्बल ९ वर्ष पाहिली वाट, आज इंग्लंडविरुद्ध केला खास कारनामा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या होतील ५ कोरोना टेस्ट, काय आहे कारण?
तो एक शांत क्रिकेटर होता, द्रविडच्या मदतीने राजस्थान रॉयल्समध्ये झाला विस्फोटक फलंदाज
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: आमीर सोहेलला “पेहली फुरसत से निकल” म्हणणारा वेंकटेश प्रसाद
आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर
वाढदिवस विशेष: माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद बद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?