---Advertisement---

‘पुजाराला संघातून वगळलं जातंय, मला विश्वासच बसत नाही,’ माजी क्रिकेटरचे भाष्य

On: शनिवार, जुलै 17, 2021 9:30 AM
---Advertisement---

भारताचा वरिष्ठ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेलेला असून त्या संघात चेतेश्वर पुजाराला देखील स्थान मिळाले आहे. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील पराभवानंतर त्याचे स्थान धोक्यात आले आहे. आता माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने भारतीय संघाच्या मधल्या फळीतील दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. चेतेश्वर पुजाराला भारतीय संघातून वगळले जाणार आहे यावर माझा विश्वास बसत नसल्याचे त्याने सांगितले आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात चेतेश्वर पुजाराला दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी केएल राहुल किंवा हनुमा विहारीचा त्याच्या जागी 11 खेळाडूंमध्ये समावेश होऊ शकेल अशा बातम्या येत आहेत.

आकाश चोप्राने दिली प्रतिक्रिया
आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आकाश चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “पुजारा गेल्यावेळी इंग्लंड दौर्‍यावर गेला होता. तेव्हा त्याने शतक झळकावले होते आणि त्यामुळे त्याची संघातील दावेदारी आणखी मजबूत झाली होती.”

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “चेतेश्वर पुजाराला संघातून बाहेर काढण्याची बातमी समोर येत आहे. परंतु मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. मला माहिती आहे तुम्ही काय विचार करत असाल की, त्याने दोन किंवा तीन वेळा इंग्लंड दौरा केला आहे. परंतु त्याची सरासरी केवळ 30 आहे. पण गेल्यावेळी भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर गेला होता. तेव्हा चेतेश्वर पुजाराने शतक केले होते. हे विसरुन चालणार नाही.’

मागील काही दिवसांपासून चेतेश्वर पुजाराने उत्कृष्ट कामगिरी केली नाही. तो सामन्यादरम्यान मैदानावर टिकून राहिला परंतु त्याला मोठी खेळी करत आली नाही. दरम्यान चेतेश्वर पुजाराचा स्ट्राईक रेटही खूपच कमी होता. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. परंतु आता हे पाहणे महत्त्वाचे राहील की, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये चेतेश्वर पुजाराला मिळेल की नाही?

महत्त्वाच्या बातम्या-

वनडेतील अव्वल फलंदाजाला जे ८३ सामन्यात नाही जमलं, ते ‘या’ धुरंधरने फक्त ७व्या सामन्यात केलं

जबरदस्त! ‘या’ ३४ वर्षीय क्रिकेटरने आठव्या क्रमांकावर ठोकले नाबाद शतक, बनवला विश्वविक्रम

आम्ही प्रेमावर प्रेम केलं…, भारतीय अष्टपैलू दुबे चढला बोहल्यावर; मैत्रीण अंजुम खानशी बांधली लग्नगाठ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---