भारतीय संघाने बांगलादेश दौऱ्यावरील 3 सामन्यांची वनडे मालिका गमावली. पहिले दोन्ही सामने बांगलादेशने शानदार पद्धतीने जिंकले. मात्र, भारतीय संघ पराभूत होताच पाकिस्तानचा माजी गोलंदाज दानिश कनेरियाने भारतीय खेळाडूंवर टीका केली. त्याने भारतीय खेळाडूंना आयपीएलऐवजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल विचार करण्यास सांगितले आहे.
बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाला वनडे मालिकेच्या सुरुवातीपासूनच विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, याच्या उलटच गोष्टी घडल्या. यजमान बांगलादेश संघाने आपल्या घरच्या मैदानावर चांगला खेळ दाखवला. तसेच, तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेतली. बांगलादेशने पहिला सामना 1 विकेटने जिंकला होता. तसेच, दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने भारताला 5 धावांनी पराभूत केले. यापूर्वी 2015मध्ये भारतीय संघाला एमएस धोनीच्या नेतृत्वातील संघाला वनडे मालिकेत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर भारतीय संघावर कडक शब्दात टीकास्त्र डागले. तो म्हणाला की, खेळाडूंना आयपीएल (IPL) स्पर्धेत मिळणाऱ्या मोठमोठ्या रकमांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल विचार केला पाहिजे. तो म्हणाला, “आयपीएलबद्दल विचार करणे बंद करा आणि देशाचा विचार करा. भारतीय क्रिकेट सर्वात महत्त्वपूर्ण आहे, फ्रँचायझी क्रिकेट नाही. फ्रँचायझी क्रिकेटमध्ये पैसा आहे, पण तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही पैसा कमवू शकता. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला महत्त्व देत नाहीत, तोपर्यंत असे परिणाम सुरूच राहतील.”
रोटेशन योजनेबद्दल बोलताना तो म्हणाला की, “फलंदाजांना ते कोणत्या क्रमांकावर खेळणार आहेत, याची खात्री नसते. कारण, त्यांना मागील काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या क्रमांकावर खेळवले आहे. गोलंदाजी आक्रमणात सातत्याने बदल होत आहेत. कोणतीही योग्य योजना किंवा अंमलबजावणी केली नाहीये. मला वाटत नाही की, कोणतीही योजना आहे. भारतीय क्रिकेट खाली खाली गेला आहे आणि बांगलादेशकडे कसोटी जिंकण्याची खूप चांगली संधी आहे.”
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (former cricketer danish kaneria strongly criticized the indian team after the odi series defeat against bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम इंडियासाठी ‘करो वा मरो’ परिस्थिती; कधी, कुठे आणि कसा पाहता येईल शेवटचा वनडे सामना?
‘हा आमचा पर्सनल मॅटर…’, सानियासोबत घटस्फोटाच्या बातम्यांवर पाकिस्तानी क्रिकेटरने सोडले मौन